किम जोंग उनला 99.93 टक्के मते, तर विरोधात 0.07 टक्के मते? उत्तर कोरियामध्ये निवडणुका कशा होतात? जाणून घ्या

उत्तर कोरियाचं नेतृत्व कायम हुकूमशाह किम जोंग उनच्या हाती राहिलेलं आहे. या देशात निवडणूक फक्त एक प्रक्रिया असते. प्रत्येक जागेसाठी फक्त एकच उमेदवार असतो. अशा स्थितीत किम जोंग उनला 99.93 टक्के मतं पडली. मग उरलेली 0.07 मतं गेली कुठे? चला जाणून घेऊयात.

किम जोंग उनला 99.93 टक्के मते, तर विरोधात 0.07 टक्के मते? उत्तर कोरियामध्ये निवडणुका कशा होतात? जाणून घ्या
किम जोंग उनला 99.93 टक्के मते, तर विरोधात 0.07 टक्के मते? उत्तर कोरियामध्ये निवडणुका कशा होतात? जाणून घ्या
Image Credit source: Contributor/Getty Images
| Updated on: Mar 20, 2026 | 7:46 PM

उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन हा सर्वेसर्वा आहे. त्याच्या विरुद्ध आवाज करणंही महागात पडू शकतं, याची कल्पना तिथल्या लोकांना आहे. त्यामुळे तोंड बंद ठेवून देव म्हणून त्याची पूजा करतात. त्याचा प्रतिस्पर्धी कोणीच नाही. भुतकाळात त्याच्या वाटेत जो कोणी आला त्याला त्याने पद्धतशीर संपवलं आहे. त्यामुळे उत्तर कोरिया म्हणजेच किम जोंग उन हे एक समीकरण आहे. पण अशा स्थितीतही तेथे निवडणुका पार पडल्या, असं जर तुम्हाला सांगितलं तर विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे. उत्तर कोरियात नुकतीच निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीचे निकाल 15 मार्च 2026 रोजी लागले. सरकारी मीडिया केसीएनएनुसार, यावेळीही मागील निवडणुकीप्रमाणेच सर्व काही तसंच घडले. किम जोंग उन यांच्या वर्कर्स पार्टी ऑफ कोरियाच्या उमेदवारांनी सर्व 687 जागा जिंकल्या. मतदानाची टक्केवारी ही 99.99 टक्के होती. तर 99.93 टक्के लोकांनी किम यांच्या उमेदवारांच्या बाजूने मतदान केलं. फक्त 0.07 टक्के लोकांनी त्यांच्या नावापुढे ‘नाही’ अशी खूण केली. त्यामुळे ही लोकं आहेत तरी कोण? असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही....

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us