कधी अंतराळातून बर्फाने झाकलेला हिमालय पाहिलाय? नासाने काढलेला हा फोटो पाहून तुम्हीही म्हणाल WOW!

| Updated on: Dec 17, 2020 | 4:23 PM

हिमालय बर्फाने झाकलेला असताना अंतराळातून कसा दिसता हे कुणी पाहिलंय का? जर तुम्ही पाहिलं नसेल तर नासाने तुमच्यासाठी मोठी पर्वणी आणली आहे.

कधी अंतराळातून बर्फाने झाकलेला हिमालय पाहिलाय? नासाने काढलेला हा फोटो पाहून तुम्हीही म्हणाल WOW!
प्रवासी विमान हिमालयातून का जात नाही?
Follow us on

वॉशिंग्टन : संपूर्ण उत्तर भारतात कडाक्याच्या थंडीचं आगमन झालंय. भारतातही हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh), उत्तराखंड (Uttarakhand) या राज्यांमध्ये बर्फ पडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे बर्फाखाली झाकलेले डोंगर आणि पर्वतांचं सौदर्य अधिकच वाढलंय. हे मनमोहक दृष्य पाहण्यासाठी लोक शिमला, मनाली जाण्याचा प्लॅनही करत असतील. या सर्वात थंडीच्या दिवसातील हिमालय पर्वताचं सौदर्य मात्र काही वेगळंच असतं. सर्वाधिक पर्यटकांच्या स्वप्नातील डेस्टिनेशन ठरलेला हा हिमालय पर्वत जमिनीवरुन अनेकांनी पाहिलाय. मात्र, हाच हिमालय बर्फाने झाकलेला असताना अंतराळातून कसा दिसता हे कुणी पाहिलंय का? जर तुम्ही पाहिलं नसेल तर नासाने तुमच्यासाठी मोठी पर्वणी आणली आहे (How Himalaya mountain with snow look from international space station NASA share picture).

अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने (NASA) आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रातून (ISS) हिमालयाचा एक फोटो टिपला आहे. हा फोटो पाहून तुम्ही हिमालय पर्वताच्या अधिकच प्रेमात पडाल आणि तुमच्या तोंडातून ‘WOW’ असाच शब्द बाहेर निघेल. नासाने अंतराळातून बर्फाने झाकलेल्या हिमालयाचा अप्रतिम फोटो घेतला आहे. नासाने हा फोटो सोशल मीडियावरही शेअर केलाय. हा फोटो पोस्ट करताना नासाने म्हटलं आहे, ‘बर्फाची चादर ओढलेल्या हिमालय पर्वताचा अद्भुत नजारा’. हा फोटो आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्राच्या एका सदस्याने घेतला आहे.

5 कोटी वर्षांपूर्वी झालेल्या महाकाय नैसर्गिक प्रक्रियेतून हिमालयाची निर्मीती

नासाने पुढे म्हटलं आहे, “जगातील सर्वात मोठ्या पर्वतांची साखळी असलेल्या हिमालयाची निर्मिती आजपासून बरोबर 5 कोटी वर्षांपूर्वी झाली होती. भारत आणि युरेशिया येथील भूगर्भातील टेक्टॉनिक प्लेट्स एकमेकांवर आदळून हिमालयाची निर्मिती झाली होती. या हिमालयाचा दक्षिण भाग भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यानचा भाग आहे. हा भूभाग शेतीसाठी अत्यंत सुपिक आहे. याचा उत्तरेकडील भाग तिब्बतचं पठार म्हणून ओळखला जातो. याला जगाचं छत म्हणूनही ओळखलं जातं.

अंतराळातून दिल्लीही चकमली

नासाने काढलेल्या फोटोत दिल्ली आणि लाहोर ही दोन शहरं देखील चमकताना दिसली. याशिवाय एक नारंगी रंगाची रेषा दिसत आहे. ही रेषा म्हणजे सोलर रेडिएशन आहे.

हेही वाचा :

नासाच्या क्युरॉसिटी रोव्हरचा थेट मंगळावर सेल्फी, खोदकाम करताना धुळीने माखलेल्या रोबोटची जोरदार चर्चा

Alert! ताशी 24046 किमी वेगाने पृथ्वीच्या दिशेने येतोय लघुग्रह, विमानाइतका आहे आकार

खुशखबर! ‘चंद्रयान 2’ मोहिमेतील विक्रम लँडरचा ठावठिकाणा लागला!

How Himalaya mountain with snow look from international space station NASA share picture