Explain : मानलं छोट्याशा इस्रायलला, म्हणून इराणचा हल्ला फसला, हे एकदा वाचा

| Updated on: Apr 16, 2024 | 11:54 AM

इस्रायल हा एक छोटासा देश आहे. भारतातल्या एखाद्या जिल्ह्याएवढ या देशाच आकारमान आहे. चहूबाजूंनी इस्रायलला शत्रुंनी घेरलेलं आहे. आतापर्यंत अनेक युद्धा या देशाने लढली आहेत. महत्त्वाच म्हणजे, एकाचवेळी अनेक देशांनी इस्रायलवर हल्ला केला, तरी इस्रायल या सर्व देशांना पुरुन उरला. इस्रायलने इराणचा मोठा हल्ला यशस्वी होऊ दिला नाही, हे इस्रायलयने कसं शक्य केलं ते एकदा वाचा.

Explain : मानलं छोट्याशा इस्रायलला, म्हणून इराणचा हल्ला फसला, हे एकदा वाचा
Iran attacks on Israel
Image Credit source: AFP
Follow us on

इराणने रविवारी इस्रायलवर मोठ्या हल्ल्याचा प्रयत्न केला. सीरियात इराणी दूतावासावर झालेल्या एअर स्ट्राइकचा बदला म्हणून इराणकडून ही कारवाई करण्यात आली. इराणने जवळपास 300 ड्रोन्स, मिसाइल इस्रायलच्या दिशेने डागले. पण इस्रायलने इराणची 99 टक्के शस्त्र हवेतच नष्ट केली. त्यामुळे इराणची हल्ल्याची योजना यशस्वी होऊ शकली नाही. इस्रायलने इराणचा हल्ला यशस्वीरित्य परतवून लावत, जगाला पुन्हा एकदा आपल्या क्षमतेची चुणूक दाखवून दिली. एकाचवेळी इतका मोठा हल्ला रोखण सोप नव्हतं. पण इस्रायलने हे शक्य करुन दाखवलं, ते टेक्नोलॉजीच्या बळावर. त्यांनी इराणचे मनसुबे धुळीस मिळवले. अमेरिका आणि अन्य मित्र राष्ट्रांनी मदत केली. पण शेवटी या हल्ल्याची किंमत इस्रायललाच चुकवावी लागणार होती. आपला शत्रू कोण आहे? त्याची क्षमता काय? त्याच्या भात्यात कुठली शस्त्रास्त्र आहेत? याची खडानखडा माहिती इस्रायलकडे असते. मागच्या अनेक दशकांपासून इस्रायलची ही रणनिती राहिली आहे. शत्रूला कमी लेखण्याची चूक ते सहसा करत नाहीत. म्हणून संभाव्य धोका हेरुन त्या हिशाबाने रणनिती तयार केली जाते. आता इराणने हल्ला करण्याआधी इस्रायलने सर्व संभाव्य धोके लक्षात घेऊन तशा पद्धतीची रणनिती अवलंबिली आहे. त्यामुळे इराणचा हल्ला यशस्वी होऊ शकला नाही.

इस्रायलने हल्लेखोरांना कन्फ्युज करण्यासाठी त्यांचे GPS सिग्नलच जॅम केले. त्यामुळेच इराणचे 99 टक्के ड्रोन्स आणि मिसाइल्स इंटरसेप्ट केली, असा इस्रायलचा दावा आहे. इराणने स्वॅर्म म्हणजे झुंडीच्या स्वरुपात ड्रोन्स पाठवली होती. इस्रायलने आपल्या टेक्नोलॉजीच्या बळावर त्यांचे जीपीएस सिग्नलच जॅम केले. रिपोर्ट्समध्ये हे म्हटलय. GPS सिग्नल जॅम केल्यामुळे शस्त्रांची गायडन्स म्हणजे मार्गदर्शन करणारी सिस्टिम गडबडली. त्यामुळे मिसाइल्स, ड्रोन्सना निश्चित टार्गेट पर्यंत पोहोचताच आलं नाही. यातून इस्रालयने युद्ध लढण्यासाठीच्या आवश्यक टेक्नेलॉजी कौशल्यातील वर्चस्व सिद्ध केलं.

इराणने कितीही गवगवा केला, तरी ते फेल

इस्रायली डिफेन्स फोर्सने ड्रोन्स आणि मिसाइल्सच्या GPS वर वार करण्यासाठी जॅमिंग टेक्नोलॉजी तैनात केली होती. ज्यामुळे त्यांची दिशा भरकटेल. सीरियात 1 एप्रिलला इराणच्या दूतावासावर हल्ला झाला होता. यात इराणी सैन्याच्या कमांडरसह सात जणांचा मृत्यू झाला होता. अधिकृतपणे इस्रायलने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. पण यामागे इस्रायलच असल्याचा इराणचा दावा आहे. इराणने इस्रायलच्या दिशेने 300 ड्रोन्स आणि मिसाइल्स डागली. पण अगदी मोजकी ड्रोन्स आणि मिसाइल्सचा स्फोट झाला. त्यामुळे इस्रायलच तुलनेने खूप कमी नुकसान झालं. आर्यन डोम हे इस्रायलच अभेद्य सुरक्षा कवच आहे. या हवाई सुरक्षा कवच प्रणालीने बहुतांश मिसाइल्स आणि ड्रोन्स हवेतच नष्ट केली. त्यामुळे इराणने कितीही गवगवा केला, तरी ते यशस्वी होऊ शकले नाहीत. त्यांचा प्लान फसला.