
Attacks on Hindus In Bangladesh : बांगलादेशात शेख हसीना यांना पंतप्रधान पदाचा राजीनामा देऊन चार महिने झाले आहेत. ऑगस्ट महिन्यात शेख हसीना यांना देश सोडावा लागला होता. त्यानंतर बांगलादेशातील कट्टरपथींनी उपद्रव माजवला आहे. त्या देशातील अल्पसंख्याकांना लक्ष केले जात आहे. हिंदूंवर हल्ले वाढत आहेत. हिंदू सरकारी कर्मचाऱ्यांची जबरदस्तीने राजीनामे घेतले गेले आहेत. मंदिरांवर हल्ले होत आहे. हंगामी पंतप्रधान मोहम्मद यूनुस हे सर्व मुकाट्याने पाहत आहेत. कट्टरपथी शक्तीपुढे ते पूर्ण हतबल झाले आहेत किंवा त्यांच्या त्यांना पाठिंबा आहे. इस्कॉन मंदिराचे चिन्मय दास प्रभु यांच्यासह अनेक हिंदू नेत्यांना तुरुंगात डांबले गेले आहे. चिन्मय दास प्रभु यांच्यावर देशद्रोहाचा आरोप लावण्यात आला आहे. इस्कॉन मंदिराशी संबंधित सर्व बँक खाती सील करण्यात आली आहे. दुसरीकडे बांगलादेशातील हिंदूंवर हल्ले वाढले आहे. हे हल्ले जमात-उल-मुजाहिदीन (JMB) ही बांगलादेशातील दहशतवादी संघटना घडवून आणत असल्याचा अहवाल इंटेलिजेन्सकडून देण्यात आला आहे. या सर्व प्रकरणात भारत सरकारने गंभीर चिंता व्यक्त केली आहे. ...