AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

यूएईच्या वाळवंटात कसा आला पूर, पाहा काय आहे कारण

मंगळवारी काही तासांच्या पावसातच दुबईत पूर आला. दीड वर्षांत सरासरी जितका पाऊस होतो तितका पाऊस एका दिवसात झाला. त्यामुळे या देशाच्या अरबी वाळवंटात वसलेल्या दुबई या जगप्रसिद्ध शहराला पूराचा फटका बसला. आता तज्ज्ञ या पावसाचे कारण निसर्गाशी होणारी छेडछाड असल्याचे सांगत आहेत.

यूएईच्या वाळवंटात कसा आला पूर, पाहा काय आहे कारण
shailesh musale
shailesh musale | Updated on: Apr 17, 2024 | 2:14 PM
Share

दुबई : संयुक्त अरब अमिराती (UAE) आणि त्याच्या आसपासच्या वाळवंटी भागात मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. जगातील सर्वात स्मार्ट शहरांपैकी एक असलेल्या दुबईमध्ये आज सर्वत्र पाणीच पाणी दिसत आहे. पावसामुळे दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ देखील बंद करावे लागले. शहरात महामार्गावर पाणी साचल्याने वाहने पाण्यात अडकली होती. शॉपिंग मॉल्सपासून ते मेट्रो स्थानकापर्यंत सर्वत्र पाणी शिरले होते. गार्डियनच्या वृत्तानुसार, सोमवारी रात्री पावसाला सुरुवात झाली आणि मंगळवारी सायंकाळपर्यंत दीड वर्षात जेवढा पाऊस पडतो तेव्हा पाऊस पडला. यूएईपूर्वी ओमानी अधिकाऱ्यांनी पुराचा इशारा दिला होता. वाळवंटात अचानक एवढा मुसळधार पाऊस येण्याचे कारण काय असा प्रश्न अनेकांना पडलाय.

क्लाउड सीडिंग हे कारण

UAE ची सरकारी वृत्तसंस्था WAM ने मंगळवारच्या पावसाला ऐतिहासिक घटना म्हटले आहे. 1949 नंतर देशातील हा सर्वाधिक पडलेला पाऊस आहे. निसर्गाशी छेडछाड हे यामागचे कारण असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत. अलीकडील पाऊस आणि त्यानंतर दुबई आणि यूएईच्या इतर भागांमध्ये आलेला पूर हे देशात होत असलेल्या क्लाउड सीडिंगशी संबंधित आहे.

संयुक्त अरब अमिराती हे पृथ्वीवरील सर्वात उष्ण आणि कोरड्या प्रदेशांपैकी एक आहे. पाऊस वाढवण्यासाठी क्लाउड सीडिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात हा देश पुढे आहे. या तंत्रज्ञानाचा मुख्य उद्देश म्हणजे वाढती लोकसंख्या आणि अर्थव्यवस्थेची पाण्याची मागणी पूर्ण करणे, जे पर्यटन आणि इतर क्षेत्रांमध्ये विविधता आणत आहे. UAE ने 2002 मध्ये क्लाउड सीडिंग ऑपरेशन सुरू केले. हे विशिष्ट कालावधीत ढगांच्या संरचनेवर लक्ष केंद्रित करते जेव्हा ते अतिरीक्त पाऊस निर्माण करतात.

ब्लूमबर्गच्या अहवालात हवामानशास्त्रज्ञ अहमद हबीब यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, नुकतीच अल-ऐन विमानतळावरून विमाने रोपणासाठी पाठवण्यात आली आहेत. UAE मध्ये पूराच्या पावसामुळे दुबई विमानतळावर पाणी भरले. यामुळे 45 उड्डाणे रद्द करण्यात आल्याने हजारो प्रवासी अडकले आहेत

क्लाउड सीडिंग म्हणजे काय?

या प्रक्रियेमध्ये सिल्व्हर आयोडाइड किंवा पोटॅशियम आयोडाइडसारखे पदार्थ विमान किंवा हेलिकॉप्टर वापरून ढगांमध्ये टाकले जातात. UAE च्या राष्ट्रीय हवामान केंद्राने पुष्टी केली की जास्तीत जास्त पाऊस सुनिश्चित करण्यासाठी सीडिंग विमानांनी दोन दिवसांत सात वेळा उड्डाण केली.

Follow Us
मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
Sanjay Raut Speech: मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही बनले...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही कसे बनले ‘सामना’चे संपादक? राज ठाकरेंनी सांगितला किस्सा!
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले...
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले, तुरुंगात पुस्तक लिहिलं अन्...
गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांकडून आरती...
माय गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांच्या आरतीने वेधले जगाचे लक्ष!
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट..
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट जारी!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची...
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची सूत्रे हाती घेतली
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखला
ही याची लायकी आणि चालला...; धंगेकरांचं बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
Ravindra Dhangekar : ही याची लायकी आणि चालला पंगा घ्यायला...; रवींद्र धंगेकरांचं नवनाथ बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट