AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगात खळबळ! भारतात पोहोचण्याच्या अगोदरच रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी जगाला दिला धक्का, काहीतरी मोठं घडणार, तब्बल इतक्या…

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारताच्या दाैऱ्यावर आहेत. अगदी काही वेळात ते भारतात दाखल होतील. त्यानंतर ते थेट हॉटेलकडे रवाना होतील. रात्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत खास डिनर त्यांचे असणार आहे. या दाैऱ्याबद्दल अत्यंत मोठी माहिती पुढे येताना दिसतंय.

जगात खळबळ! भारतात पोहोचण्याच्या अगोदरच रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी जगाला दिला धक्का, काहीतरी मोठं घडणार, तब्बल इतक्या...
Vladimir Putin
| Updated on: Dec 04, 2025 | 4:44 PM
Share

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन दोन दिवसीय भारत दाैऱ्यावर आहेत. या हायप्रोफाइल भेटीसाठी दिल्ली पूर्णपणे सज्ज आहे. युक्रेन युद्धानंतर पुतिन यांचा हा पहिलाच भारत दौरा असणार आहे. अमेरिकेने भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर भारतावर रशियाकडून व्यापार न करण्यासाठी दबाव आहे. मात्र, अशा परिस्थितीमध्येही भारताने रशियासोबत व्यापार सुरू ठेवला. भारत हा रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने 50 टक्के टॅरिफ अमेरिकेने लावला. मुळात म्हणजे भारत आणि रशियातील मैत्री ही संपूर्ण जगाची मोठी पोटदुखी आहे. भारताच्या मदतीला कायमच रशिया धावून आला. अमेरिकेने लावलेल्या टॅरिफचा फार काही परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर झाला नाही. पुतिन यांच्या भारत दाैऱ्याकडे संपूर्ण जगाच्या नजरा आहेत. हेच नाही तर यादरम्यान काही महत्वाचे करार देखील होऊ शकतात.

पुतिन आज संध्याकाळी दिल्लीत पोहोचतील आणि विमानतळावरून थेट सरदार पटेल मार्गावरील त्यांच्या हॉटेलमध्ये जातील. संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पुतिन एकत्र जेवण करतील. प्रत्येक गोष्टीचे खास नियोजन करण्यात आलंय. हेच नाही तर यादरम्यान मोठी सुरक्षा देखील असेल. फक्त पुतिन हेच नाही तर रशियाचे तब्बल 7 मंंत्रीही या दाैऱ्यामध्ये सहभागी आहेत. अनेक मोठे करार होण्याचे थेट संकेत आहेत.

पुतिन यांच्यासोबत एक किंवा दोन मंत्री भारत दाैऱ्यावर आले असते तर इतकी चर्चा रंगली नसती. मात्र, पुतिन आपल्यासोबत तब्बल 7 मंत्री घेऊन आल्याने काहीतरी मोठं घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. फक्त करारच नाही तर भारतावर सध्या अमेरिकेचा जो दबाव आहे, त्यावरही यादरम्यान चर्चा होईल. अमेरिकेने भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर रशियाने जगाला दाखवून दिले की, आम्ही त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे आहोत.

या भेटीकडे भारत-रशिया संबंधांमध्ये एक महत्त्वाचा टप्पा म्हणून पाहिले जात आहे. शुक्रवारी होणाऱ्या 23 व्या वार्षिक शिखर परिषदेत संरक्षण सहकार्य, ऊर्जा, व्यापार आणि अमेरिकेच्या निर्बंधांचा परिणाम यासह विविध मुद्द्यांवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. भारताकडून या दाैऱ्यावर पूर्ण नियोजन करण्यात आले आहे. रशिया आणि भारतातील मैत्री अनेक वर्षांपासूनची आहे. अमेरिका प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेऊन आहे.

Follow Us
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून टीका
तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना आवाहन
Raj Thackeray : तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना मोठं आवाहन
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदी...
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदींची पोस्ट चर्चेत!
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी...
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी व्यक्त केला आनंद, म्हणाले…
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं काय घडलं?
विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
Maharashtra MLC Election Result 2026 : विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत...
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत निवडणुकांवर उपस्थित केले सवाल
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा...
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी!
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश,
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश, 17 नोव्हेंबरला प्रत्यक्ष हजर राहावे लागणार!
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच...
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच... सुप्रिया सुळेंचं भावनिक विधान