नवजात बाळ प्लास्टिकमध्ये सापडलं, 'इंडिया बेबी'ला दत्तक घेण्यासाठी रांगा

आपण नवजात बाळ सापडल्याच्या अनेक बातम्या वाचल्या असतील. मात्र, अशा सापडलेल्या बाळाला दत्तक घेण्यासाठी जगभरात रांगा लागल्याचे कधी ऐकले आहे का? हो, अमेरिकेत असाच काहीसा प्रकार घडला आहे.

नवजात बाळ प्लास्टिकमध्ये सापडलं, 'इंडिया बेबी'ला दत्तक घेण्यासाठी रांगा

वॉशिंग्टन : आपण नवजात बाळ सापडल्याच्या अनेक बातम्या वाचल्या असतील. मात्र, अशा सापडलेल्या बाळाला दत्तक घेण्यासाठी जगभरात रांगा लागल्याचे कधी ऐकले आहे का? हो, अमेरिकेत असाच काहीसा प्रकार घडला आहे. अमेरिकेतील जॉर्जिया येथे एका प्लास्टिक बॅगत नवजात बाळ सापडले. या बाळाला दत्तक घेण्यासाठी चक्क जगभरात रांगा लागल्या आहेत. या मुलीचं टोपण नाव ‘इंडिया’ असं आहे. ती 6 जून रोजी सापडली.

जॉर्जियातील एका ठिकाणी लहान बाळाचा रडण्याचा आवाज ऐकू आल्याने तेथील रहिवाशांनी तत्काळ पोलिसांना कळवले. पोलिसांनी प्लास्टिकमध्ये गुंडाळलेले ते बाळ पाहिले तर त्यात नवजात मुलगी होती. पोलिसांनी या मुलीला रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान बाळ अगदी व्यवस्थित असून त्याचे वजनही चांगले वाढत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

यानंतर 3 आठवड्यानंतर ‘बेबी इंडिया’ हसायला आणि खेळायला लागली. त्यानंतर तिला बाल संगोपन केंद्राकडे देण्यात आले. आता तिला नवं घर मिळेपर्यंत बेबी इंडिया येथेच राहिल. पोलिसांकडून बेबी इंडियाच्या पालकांचा शोध घेतला जात आहे. मात्र, त्यांची अजून कोणतीही माहिती मिळाली नसल्याचे सांगण्यात आले.


असे असले तरी बेबी इंडियाला कायमस्वरुपीचे हक्काचे घर मिळण्यासाठी कोणतीही अडचण नसल्याचे बाल संगोपन केंद्राकडून स्पष्ट करण्यात आले आहे. जगभरातील अनेक कुटुंबं बेबी इंडियाला दत्तक घेण्यासाठी उत्सुक आहेत, असेही नमूद करण्यात आले. बेबी इंडिया ज्या नाट्यमयरित्या सापडली आणि तिला वाचवण्यात आले, त्यामुळे याच्या जगभरात बातम्या झाल्या. त्यामुळेच शेकडो कुटुंबं तिला दत्तक घेण्यासाठी पुढे आली आहेत.

बेबी इंडिया प्लास्टिक बॅगमध्ये सापडली तेव्हा तिची नाळही तोडलेली नव्हती. जन्मनंतर काही तासातच तिला टाकून देण्यात आले होते. ती अगदी सुखरुप सापडली हा एक मोठा चमत्कार असल्याचे तिला वाचवणाऱ्या पोलिसांनी सांगितले.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *