आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ
अमेरिका आणि इराणमधील तणाव पुन्हा एकदा वाढला असून, आता डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला मोठी धमकी दिली आहे, तसेच इराणने आता स्ट्रेट ऑफ होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजांवर हल्ल्याचा प्रयत्न करू नये असंही त्यांनी म्हटलं आहे.

28 फेब्रुवारीला इस्त्रायलकडून इराणवर मोठा हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर भीषण युद्धाला सुरुवात झाली, या युद्धात अमेरिकेनं देखील उडी घेतली. तब्बल 40 दिवसांनंतर इराण आणि अमेरिकेमध्ये युद्धविराम झाला होता. परंतु आता पुन्हा एकदा युद्ध चांगलंच पेटलं आहे. अमेरिकेकडून इराणवर हल्ले सुरू आहेत, तर इराणकडून देखील प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेचं सैन्यतळ ज्या -ज्या देशांमध्ये आहेत, त्या देशांवर हल्ले करण्यात येत आहेत. दरम्यान या युद्धामुळे मध्य पूर्वेत तणाव वाढलेला असतानाच आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पु्न्हा एकदा इराणला धमकी दिली आहे, या धमकीमुळे मोठी खळबळ उडाली आहे. जर इराणने स्ट्रेट ऑफ होर्मुजमधून जाणाऱ्या एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही इराणच्या पायाभूत सुविधांना लक्ष्य करू अशी धमकी ट्रम्प यांनी इराणला दिली आहे, त्यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म ट्रूथवर या संदर्भात पोस्ट केली आहे.
जर इराणकडून स्ट्रेट ऑफ होर्मूजमधून जाणाऱ्या एकाही व्यापारी जहाजांवर हल्ला करण्यात आला तर आम्ही इराणच्या पायभूत सुविधांना लक्ष्य करू, त्या उद्ध्वस्त करू, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. ट्रम्प यांनी इराणला मोठा इशारा दिला आहे. आता इराणकडून स्ट्रेट ऑफ होर्मूजमधून जाणाऱ्या कोणत्याही जाहाजावर, मिसाईल, रॉकेट, ड्रोन किंवा इतर कोणत्याही साधनांद्वारे हल्ला करण्यात आला, तर आम्ही इराणचे पूल आणि पावर प्लांट उद्ध्वस्त करू असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या या धमकीनंतर आता इराण आणि अमेरिकेमधील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.
इराणने जर जहाजांवर हल्ला केला तर आम्ही इराणची राजधानी तेहरानच्या आसपास असलेले सर्व पूल आणि पावर प्लँट उद्ध्वस्त करू, असंही ट्र्म्प यांनी म्हटलं आहे. अमेरिकेकडून इराणविरोधात सैन्य कारवाई सुरूच आहे. काही दिवसांपूर्वी इराण आणि अमेरिकेमधील युद्धविराम आता संपला असल्याची घोषणा ट्रम्प यांनी केली होती, तेव्हापासून अमेरिकेच्या सैन्यांकडून सातत्याने इराणवर हल्ले सुरूच आहेत, आकरा दिवसांपासून हे भीषण हल्ले सुरू आहेत, या हल्ल्यांमध्ये इराणचं मोठं नुकसान झालं आहे.