Ishaq Dar : अरेरे, सीजफायरच्या बैठकीत पाकिस्तानी परराष्ट्र मंत्र्यांसोबत नको ते घडलं, सगळ्यांसमोर धाडकन खाली आपटले VIDEO

Ishaq Dar : पाकिस्तान सध्या अमेरिका आणि इराणमध्ये सीजफायर घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी एका महत्वाच्या आंतरराष्ट्रीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात पाकिस्तानी परराष्ट्र मंत्र्यांसोबत एक नको ती घटना घडली. त्यांचा खांदा फ्रॅक्चर झाला आहे.

Ishaq Dar : अरेरे, सीजफायरच्या बैठकीत पाकिस्तानी परराष्ट्र मंत्र्यांसोबत नको ते घडलं, सगळ्यांसमोर  धाडकन खाली आपटले VIDEO
Pakistan foreign minister ishaq dar
| Updated on: Mar 30, 2026 | 1:54 PM

इराण आणि अमेरिकेत मध्यस्थी घडवून आणण्यासाठी संदेशवाहक बनलेल्या पाकिस्तानी परराष्ट्र मंत्र्यांचा खांदा फ्रॅक्चर झाला आहे. ही माहिती त्यांच्या मुलाने दिली आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार रविवारी इजिप्तच्या परराष्ट्र मंत्र्यांचं स्वागत करत होते. त्यावेळी ते खाली पडले. त्यांना लगेच रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे चाचण्या केल्यानंतर त्यांचा खांदा फ्रॅक्चर झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. डार पाकिस्तानच्या उप पंतप्रधान पदावर आहेत. “खाली पडल्यानंतरही इशाक डार यांनी स्वत:चा संयम ढळू दिला नाही. फोटो सेशन नंतर ते घरी आले, त्यावेळी सुद्धा वेदनेने विव्हळत होते. आधी त्यांनी पेन किलरच्या गोळ्या घेतल्या. पण त्याचा परिणाम झाला नाही. त्यानंतर आम्ही त्यांना डॉक्टरकडे घेऊन गेलो” असं इशाक डार यांचा मुलगा मीडियाशी बोलताना म्हणाला.

सीजफायरची प्रक्रिया पुढे नेण्यासाठी रविवारी पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये इजिप्त, तुर्की आणि सौदी अरेबियाच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक झाली. यात डार सहभागी झालेले. डार अमेरिका आणि इराणमध्ये संदेश वाहकाची भूमिका बजावत आहेत. डार यांनीच अमेरिकेचा संदेश इराण पर्यंत पोहोचवला. मीटिंगनंतर मंचावर फोटोसाठी सर्व नेते एकत्रित झाले. त्याचवेळी ते खाली पडले. त्यानंतर ते उठून उभे राहिले. फोटो सेशन केलं व नंतर घरी निघून गेले. पाकिस्तानी उप पंतप्रधान खाली पडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

इशाक डार कोण आहेत?

इशाक डार यांच्या मुलाने दिलेल्या माहितीनुसार, परराष्ट्र मंत्री उपचारासाठी तयार नव्हते. पण कुटुंबियांनी दबाव टाकल्यानंतर ते रुग्णालयात दाखल झाले. 75 वर्षीय इशार डार पाकिस्तानातील सत्तारुढ पार्टी पीएमएल-एनचे सीनियर नेते आहेत. पाकिस्तानात महत्वाची मंत्रीपदं त्यांच्याकडे आहेत. त्यांना माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचं निकटवर्तीय मानलं जातं. डार नवाज शरीफ यांचे नातेवाईक सुद्धा आहेत. डार सध्या पाकिस्तानचे उपपंतप्रधान असून त्यांच्याकडे परराष्ट्र मंत्रालयाची जबाबदारी आहे.

तेहरानने अजूनपर्यंत हार मानलेली नाही. म्हणून अमेरिकेकडून सीजफायरचे प्रयत्न सुरु आहेत. त्यात पाकिस्तान संदेश वाहकाच्या भूमिकेत आहे. पाकिस्तानकडून डार ही जबाबदारी संभाळत आहेत.

 

Follow Us