Sanjay Shirsat | अशोक खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले, ‘कोणी कोणाला भेटणे…’
शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले, “भोंदू लोक असतील किंवा बाब लोक असतील, जेव्हा थेट एखाद्या मंत्र्याशी, आमदाराशी किंवा खासदाराशी संपर्क येतो, तेव्हा अनेक लोक त्यांचा वापर करून आपले काम करून घेतात.” शिरसाट यांनी पुढे स्पष्ट केले की, “39 आमदार किंवा पाच-पन्नास खासदार हे जे कोणी भेटले असतील, त्यावरून कोणाचाही गुन्हा सिद्ध होत नाही. कोणी कोणाला भेटणे गुन्हा नाही; गुन्ह्यात थेट सहभाग असणेच गुन्हा आहे.”
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात दररोज नवनवे खुलासे होत असताना, सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी खळबळजनक आरोप करत शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. देसाईंच्या दाव्यानुसार, गोऱ्हे गेल्या 5 ते 6 वर्षांपासून अशोक खरातच्या संपर्कात राहिल्या असून त्या राजकीय फायद्यासाठी त्यांना भेटत होत्या. या आरोपांनंतर राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले, “भोंदू लोक असतील किंवा बाब लोक असतील, जेव्हा थेट एखाद्या मंत्र्याशी, आमदाराशी किंवा खासदाराशी संपर्क येतो, तेव्हा अनेक लोक त्यांचा वापर करून आपले काम करून घेतात.” शिरसाट यांनी पुढे स्पष्ट केले की, “39 आमदार किंवा पाच-पन्नास खासदार हे जे कोणी भेटले असतील, त्यावरून कोणाचाही गुन्हा सिद्ध होत नाही. कोणी कोणाला भेटणे गुन्हा नाही; गुन्ह्यात थेट सहभाग असणेच गुन्हा आहे.”
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत

