AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उन्हाळ्यात बेल फळांपासून बनवलेला मुरंबा पोटाला देतो थंडावा, जाणून घ्या बनवण्याची सोपी रेसिपी

आंब्याचा मुरंबा हा प्रत्येकाने खाल्ला असेल पण बेलफळाचा मुरंबा खूप कमी लोकांना महिती आहे. चला तर मग आजच्या लेखात बेलफळाचा मुरंबा कसा बनवायचा आणि त्याचे फायदे कोणते आहेत ते देखील जाणून घेऊयात.

उन्हाळ्यात बेल फळांपासून बनवलेला मुरंबा पोटाला देतो थंडावा, जाणून घ्या बनवण्याची सोपी रेसिपी
बेल फळाचा मुरांबाImage Credit source: Tv9 Marathi
| Edited By: | Updated on: Mar 30, 2026 | 2:13 PM
Share

बेलफळाला अनेक प्रकारच्या नावाने ओळखले जाते. जसे की क्विन्स, गोल्डन ॲपल, वुड ॲपल, जपानी बिटर ऑरेंज किंवा स्टोन ॲपल. बेलफळ हे उन्हाळ्यात तुमच्या आरोग्यासाठी एक सुपरफूड आहे. कारण या फळाच्या सेवनाने तुमच्या शरीराला केवळ थंडावाच मिळत नाही, तर पचनासाठीही याचे उत्कृष्ट फायदे आहेत. तसेच भगवान शंकराच्या पूजेत वापरली जाणारी बेलाची पाने देखील आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. बेलफळ हे पोषक तत्वांचा खजिना आहे. उन्हाळ्याच्या दिवसात प्रत्येकांच्या घरी आंब्यापासून मुरंबा बनवला जातो. तसाच बेलफळाचा मुरंबा देखील बनवला जातो. बेलफळापासून बनवलेला मुरंबा हा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

पबमेडनुसार बेलफळ विविध पोषक तत्वांनी समृद्ध आहे. त्यात अल्कलॉइड्स, फ्लेव्होनॉइड्स, फिनोलिक ॲसिड्स, प्रोटोकॅटेच्युइक ॲसिड, गॅलिक आणि इलाजिक ॲसिड्स यांसारखे विविध फायटोकेमिकल्स असतात. हे फळ अतिसारावर गुणकारी आणि यकृतासाठी फायदेशीर मानले जाते. हे फळ मधुमेहींसाठीही चांगले मानले जाते. बेलफळात फॉस्फरस, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह, तांबे, जस्त आणि क्रोमियम यांसारखी खनिजे, तसेच जीवनसत्त्वे असतात. चला बेलफळापासून मुरंबा कसा बनवायचा ते जाणून घेऊया.

बेलफळांचा मुरंबा बनवण्यासाठी लागणारे साहित्य

-तुम्हाला लागणारा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे बेलफळ.

-साधारण 1 किलो बेलफळ

-थोडस पाणी

-१ किलो खडीसाखर

-चवीसाठी अर्धा चमचा हिरव्या वेलचीची पूड

बेलफळाचा मुरंबा कसा बनवायचा?

-सर्वप्रथम पिकलेले बेलफळ घ्या आणि ते पाण्याने स्वच्छ धुवा आणि नंतर कापडाने पुसून कोरडे करा.

-बेलफळाची साल खूप कडक असते, म्हणून ती लाटण्याने किंवा कोणत्याही जड वस्तूने फोडा.

-आता फोडलेल्या बेलफळाचे सुरीच्या मदतीने काप करा.

-आता तुम्हाला एका पातेल्यात पाणी उकळायला ठेवावे लागेल आणि मग त्यात स्टीमर भांड ठेवाव लागेल.

-जेव्हा पाणी खळखळून उकळू लागते आणि त्यातून वाफ येऊ लागते, तेव्हा बेलफळाचे तुकडे स्टीमर भांड्यात ठेवून ती झाकून टाका.

-8 ते 10 मिनिटांत बेल शिजून तयार होतील, त्यानंतर गॅस बंद करा, हे बेल स्टीमरमधून बाहेर काढून एका भांड्यात त्यांचा गर काढून ठेवा.

-एक मोठे पातेले घ्या आणि त्यात खडीसाखर टाका. लक्षात ठेवा, प्रत्येक 1 किलो खडीसाखरेसाठी 1 लिटर पाणी त्यात मिक्स करा. गरजेनुसार तुम्ही साखर कमी वापरू शकता.

-आता तुम्हाला घट्ट पाक तयार होईपर्यंत मिश्रण उकळावे लागेल, ज्यासाठी किमान अर्धा तास लागू शकतो.

-तयार केलेल्या पाकात वेलची पूड मिक्स करा आणि नंतर त्यात शिजलेल्या बेलफळाचे गर टाका. बेलाच्या गऱ्यांसहित पाक 5 मिनिटे शिजू द्या आणि नंतर गॅस बंद करा.

अशा प्रकारे तयार केलेला बेलफळाचा मुरंबा फायदेशीर असतो. तो हवाबंद काचेच्या डब्यात ठेवा.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
नाशिक IT कंपनी धर्मांतरण प्रकरणी मोठी अपडेट समोर! मुख्य संशयित आरोपी..
Big Breaking | नाशिक IT कंपनी धर्मांतरण प्रकरणी मोठी अपडेट समोर! मुख्य संशयित आरोपी निदा खानला...
मोठी राजकीय घडामोडी! शरद पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची...
मोठी राजकीय घडामोडी! शरद पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची महत्त्वाची बैठक सुरू, बारामतीतील...
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी, वाहतूक मंदावल्याने
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी, वाहतूक मंदावल्याने प्रवाशांना त्रास!
पंचगंगा नदीचं महारौद्ररुप! पाणीपातळी थेट 34 फुटांपर्यंत, डोळे विस्फारण
पंचगंगा नदीचं महारौद्ररुप! पाणीपातळी थेट 34 फुटांपर्यंत, डोळे विस्फारणारं दृश्य
पाहणारे पाहतच राहिले! मुंबईत समुद्राला तुफान भरती, 4.26 मीटर उंच...
पाहणारे पाहतच राहिले! मुंबईत समुद्राला तुफान भरती, 4.26 मीटर उंच उसळल्या लाटा
उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडली; बदलापूरमध्ये पूराचा मोठा धोका
Badlapur | धोक्याची घंटा! उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडली; बदलापूरमध्ये पूराचा मोठा धोका
सतर्क राहा...मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे आवाहन! 8 तारखेपर्यंत अलर्ट,
सतर्क राहा...मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे आवाहन! 8 तारखेपर्यंत अलर्ट, 300 मिमी पावसासह ढगफुटी...
प्रशासनाचा मोठा निर्णय; पुढील आदेशापर्यंत मुंबई–पुणे एसटी बस बंद
मोठी बातमी! प्रशासनाचा मोठा निर्णय; पुढील आदेशापर्यंत मुंबई–पुणे एसटी बस बंद
पुणे हादरलं! मावळमधील दरड दुर्घटनेत तीघांचा मृत्यू तर एकाच कुटुंबातील
पुणे हादरलं! मावळमधील दरड दुर्घटनेत तीघांचा मृत्यू तर एकाच कुटुंबातील... थरकाप उडवणारे दृश्य समोर
नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट! शाळा, बाजार, मंदिरेही बंद
Nashik | नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट! शाळा, बाजार, मंदिरेही बंद; प्रशासनाचा मोठा निर्णय