AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ZIM : इंग्लंड टी20 मालिका सुरू असताना झिम्बाब्वे दौऱ्यासाठी संघ जाहीर, संजू सॅमसनचा पत्ता कट

भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसऱ्या सामन्याची तयारी सुरू असताना झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया जाहीर केली आहे. या संघातून संजू सॅमसनला वगळण्यात आलं आहे.

IND vs ZIM : इंग्लंड टी20 मालिका सुरू असताना झिम्बाब्वे दौऱ्यासाठी संघ जाहीर, संजू सॅमसनचा पत्ता कट
IND vs ZIM : इंग्लंड टी20 मालिका सुरू असताना झिम्बाब्वे दौऱ्यासाठी संघ जाहीर, संजू सॅमसनचा पत्ता कटImage Credit source: BCCI
| Updated on: Jul 06, 2026 | 7:41 PM
Share

भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यानंतर तीन सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी झिम्बाब्वे दौऱ्यासाठी जाणार आहे. या मालिकेसाठी श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात टीम इंडिया जाहीर केली आहे. या संघातून इंग्लंड दौऱ्यातील काही खेळाडूंना वगळण्यात आलं आहे. यात संजू सॅमसन याचं नाव आघाडीवर आहे. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहे. कारण दुसऱ्या टी20 सामन्यात वैभव सूर्यवंशीला जागा मिळावी यासाठी त्याला बसवलं होतं. आता झिम्बाब्वे मालिकेसाठी त्याला संघातून वगळण्यात आलं आहे. संजू सॅमसन आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी टी20 संघाचा भाग होता. मात्र आता त्याला झिम्बाब्वे दौऱ्यात स्थान दिलं नाही. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तीन सामन्यांची टी20 मालिका 23 जुलैपासून सुरू होणार आहे.

झिम्बाब्वेसाठी भारताचा संघ : श्रेयस अय्यर (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा (उपकर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), शिवम दुबे, सूर्यांश शेडगे, रिंकू सिंग, हर्ष दुबे, वरुण चक्रवर्ती, प्रिन्स यादव, यश ठाकुर, अशोक शर्मा, मयंक यादव आणि प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर)

भारत आणि झिम्बाब्वे दौऱ्याचं वेळापत्रक

  • भारत आणि झिम्बाब्वे पहिला टी20 सामना, 23 जुलै 2026, हरारे
  • भारत आणि झिम्बाब्वे दुसरा टी20 सामना, 25 जुलै 2026, हरारे
  • भारत आणि झिम्बाब्वे तिसरा टी20 सामना, 26 जुलै 2026, हरारे

इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी संघात बदल

भारत आणि इंग्लंड यांच्यात टी20 मालिकेनंतर वनडे मालिका होणार आहे. या मालिकेसाठी भारताने शुबमन गिलच्या नेतृत्वात आधीच संघ जाहीर केला आहे. या संघाता आता एक बदल करण्यात आला आहे. दुखापतग्रस्त नितीश कुमार रेड्डीच्या जागी शिवम दुबेला संघात स्थान दिलं आहे.

इंग्लंड वनडे मालिकेसाठी संघ : शुबमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), केएल राहुल (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, हार्षित राणा, अर्शदीप सिंग, गुरनूर ब्रार आणि शिवम दुबे.

Follow Us
अभिजीत दिपकेंना पोलिसांनी ताब्यात घेतलं; मुंबईतून दिल्लीला पोहोचले अन्
Abhijeet Dipke At Delhi : मुंबईतून दिल्लीला पोहोचले अन् विमानातच पोलिसांची कारवाई; अभिजीत दिपकेंना पोलिसांनी ताब्यात घेतलं
56 इंच छातीवाले देशातील तरुणांना घाबरले? राऊतांचा मोदी-शहांवर हल्लाबोल
Sanjay Raut : 56 इंच छातीवाले देशातील तरुणांना घाबरले? संजय राऊतांचा मोदी-शहांवर थेट हल्लाबोल
भारतीय तरुणांना कोणीही... चिराग पासवान यांचं मोठं विधान
Chirag Paswan : भारतीय तरुणांना कोणीही... चिराग पासवान यांचं मोठं विधान; रेल्वे-मेट्रो बंदीवरून नेमकं काय म्हणाले?
काहीही झालं तरी आंदोलन करणार; 500 हून अधिक आंदोलक ताब्यात, तरीही....
Delhi CJP Protester : काहीही झालं तरी आंदोलन करणार; 500 हून अधिक आंदोलक ताब्यात, तरीही CJP कार्यकर्ते...
आज कदाचित शेवटची सभा असू शकते; रोहित पवार असं का म्हणाले?
Rohit Pawar Speech : आज कदाचित शेवटची सभा असू शकते; रोहित पवार असं का म्हणाले?
दिल्लीमध्ये 15 हजार पोलीस तैनात; CJP आंदोलनाला परवानगी नाही मात्र...
CJP Delhi Protest : दिल्लीमध्ये 15 हजार पोलीस तैनात; CJP आंदोलनाला परवानगी नाही मात्र अभिजीत दीपके...
जंतर-मंतरवरील आंदोलनावर पोलिसांची ड्रोनद्वारे नजर; प्रत्येक हालचाल...
Delhi CJP Jantar Mantar Protest : जंतर-मंतरवरील आंदोलनावर पोलिसांची ड्रोनद्वारे नजर; 150 पोलिसांना बॉडी कॅमेरे, प्रत्येक हालचाल होणार...
ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील आंदोलनाचा धसका? जंतरमंतर परिसरात जाणारे
Delhi CJP Jantar Mantar Andolan : ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील आंदोलनाचा धसका? जंतरमंतर परिसरात जाणारे सर्व रस्ते बंद, इंटरनेट सेवाही...
सीजेपी आंदोलनाआधी दिल्लीचं छावणीत रूपांतर; जंतर-मंतरवर BSF, CRPF अन्..
Delhi Jantar- Mantar CJP Andolan : सीजेपी आंदोलनाआधी दिल्लीचं छावणीत रूपांतर; जंतर-मंतरवर BSF, CRPF अन्....
मला अटक करा... अभिजीत दीपकेंचं सरकारला खुलं आव्हान, पुढे म्हणाले...
Abhijeet Dipke : मला अटक करा... अभिजीत दीपकेंचं सरकारला खुलं आव्हान, पुढे म्हणाले...