AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG: वैभव सूर्यवंशी आणि संजू सॅमसन दोघंही खेळणार! तिसऱ्या टी20 सामन्यात कोणाचा पत्ता कापणार?

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात टीम इंडियाची टी20 मालिकेत सुमार कामगिरी सुरू आहे. ऑयर्लंडविरुद्धची मालिका गमावल्यानंतर आता इंग्लंडमध्येही 0-1 ने पिछाडीवर आहे. असं असताना तिसऱ्या टी20 मालिकेत कोणत्या प्लेइंग 11 सह उतरणार याची चर्चा सुरू आहे.

IND vs ENG: वैभव सूर्यवंशी आणि संजू सॅमसन दोघंही खेळणार! तिसऱ्या टी20 सामन्यात कोणाचा पत्ता कापणार?
IND vs ENG: वैभव सूर्यवंशी आणि संजू सॅमसन दोघंही खेळणार! तिसऱ्या टी20 सामन्यात कोणाचा पत्ता कापणार?Image Credit source: Getty Images
| Updated on: Jul 06, 2026 | 7:22 PM
Share

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील तिसरा सामना नॉटिंघमच्या ट्रेंट ब्रिज येथे खेळला जाणार आहे. या मालिकेत बरोबरी साधण्यासाठी भारताला या विजय मिळवणं आवश्यक आहे. या मालिकेतील पहिला सामना पावासमुळे रद्द झाला. तर दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने विजय मिळवला. त्यामुळे मालिकेत इंग्लंडने 1-0 ने आघाडी घेतली आहे. असं असताना तिसरा टी20 सामन्यात भारताला विजय महत्त्वाचा आहे. अन्यथा मालिका गमवण्याची वेळ टीम इंडियावर येऊ शकते. आता प्रश्न असा आहे की, तिसऱ्या टी20 सामन्यात कोणत्या प्लेइंग 11 सह भारतीय संघ मैदानात उतरेल. कारण मागच्या सामन्यात विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसनला बसवलं होतं. तर त्याच्या जागी वैभव सूर्यवंशीला संघात जागा दिली होती. संजू सॅमसनला तिसऱ्या टी20 सामन्यात खेळवणार अशी माहिती समोर येत आहे.

संजू सॅमसन प्लेइंग 11 भाग असेल?

मिडिया रिपोर्टनुसार, संजू सॅमसनला तिसऱ्या टी20 सामन्यासाठी संघात स्थान मिळेल. मागच्या सामन्यात त्याला बसवून वैभव सूर्यवंशीला स्थान दिलं होतं. पण आता प्लेइंग 11 चा भाग असेल असं सांगितलं जात आहे. इतकंच काय तर संजू सॅमसनसह वैभव सूर्यवंशीही संघाचा भाग असेल. म्हणजेच तिसऱ्या सामन्यात वैभव सूर्यवंशी आणि अभिषेक शर्मा हे ओपनिंग करतील. तर संजू सॅमसन तिसऱ्या स्थानावर उतरेल. पण संजू सॅमसन प्लेइंग 11 भाग झाला तर कोणाला बसवलं जाईल? हा मोठा प्रश्न आहे. टीम इंडियाच्या मधल्या फळीत डावखुऱ्या फलंदाजांचा भरणा आहे. संजू सॅमसन तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला तर उजवं डावं कॉम्बिनेशन राहिल.

रवि बिष्णोईचा पत्ता कापला जाणार?

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात रवि बिष्णोईच्या सुमार गोलंदाजीचा फटका टीम इंडियाला बसला होता. त्याने 4 षटकात 60 धावा दिल्या. इतकंच काय तर एकाच षटकात 29 धावा देऊन भारताला पराभवाच्या दरीत ढकललं. इतकंच काय तर या सामन्यात रवि बिष्णोईने तीन नो बॉल टाकले. या फ्री हिटवर इंग्लंडने 16 धावा काढल्या. त्यामुळे दुसऱ्या सामन्यातील सुमार कामगिरी पाहून त्याला संधी देणं कठीण आहे. त्याच्या जागी प्रिन्स यादव किंवा वॉशिंग्टन सुंदरला संधी दिली जाऊ शकते. तर हार्षित राणालाही आराम दिला जाणार असल्याचं बोललं जात आहे.

तिसऱ्या टी20 सामन्यासाठी संभाव्य प्लेइंग 11 : वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन, श्रेयस अय्यर, तिलक वर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, वरुण चक्रवर्ती आणि प्रिंस यादव

Follow Us
हे हिटलरशाहीचं सरकार...; प्रकाश आंबेडकर यांचा केंद्र सरकारवर घणाघात
Prakash Ambedkar : हे हिटलरशाहीचं सरकार...; प्रकाश आंबेडकर यांचा केंद्र सरकारवर घणाघात, पुढे म्हणाले...
....हे खात्रीने सांगतो, राहुल गांधींचं मोठं विधान; दिल्लीच्या....
....हे खात्रीने सांगतो, राहुल गांधींचं मोठं विधान; दिल्लीच्या राजकारणात खळबळ
अभिजीत दिपकेंना पोलिसांनी ताब्यात घेतलं; मुंबईतून दिल्लीला पोहोचले अन्
Abhijeet Dipke At Delhi : मुंबईतून दिल्लीला पोहोचले अन् विमानातच पोलिसांची कारवाई; अभिजीत दिपकेंना पोलिसांनी ताब्यात घेतलं
56 इंच छातीवाले देशातील तरुणांना घाबरले? राऊतांचा मोदी-शहांवर हल्लाबोल
Sanjay Raut : 56 इंच छातीवाले देशातील तरुणांना घाबरले? संजय राऊतांचा मोदी-शहांवर थेट हल्लाबोल
भारतीय तरुणांना कोणीही... चिराग पासवान यांचं मोठं विधान
Chirag Paswan : भारतीय तरुणांना कोणीही... चिराग पासवान यांचं मोठं विधान; रेल्वे-मेट्रो बंदीवरून नेमकं काय म्हणाले?
काहीही झालं तरी आंदोलन करणार; 500 हून अधिक आंदोलक ताब्यात, तरीही....
Delhi CJP Protester : काहीही झालं तरी आंदोलन करणार; 500 हून अधिक आंदोलक ताब्यात, तरीही CJP कार्यकर्ते...
आज कदाचित शेवटची सभा असू शकते; रोहित पवार असं का म्हणाले?
Rohit Pawar Speech : आज कदाचित शेवटची सभा असू शकते; रोहित पवार असं का म्हणाले?
दिल्लीमध्ये 15 हजार पोलीस तैनात; CJP आंदोलनाला परवानगी नाही मात्र...
CJP Delhi Protest : दिल्लीमध्ये 15 हजार पोलीस तैनात; CJP आंदोलनाला परवानगी नाही मात्र अभिजीत दीपके...
जंतर-मंतरवरील आंदोलनावर पोलिसांची ड्रोनद्वारे नजर; प्रत्येक हालचाल...
Delhi CJP Jantar Mantar Protest : जंतर-मंतरवरील आंदोलनावर पोलिसांची ड्रोनद्वारे नजर; 150 पोलिसांना बॉडी कॅमेरे, प्रत्येक हालचाल होणार...
ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील आंदोलनाचा धसका? जंतरमंतर परिसरात जाणारे
Delhi CJP Jantar Mantar Andolan : ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील आंदोलनाचा धसका? जंतरमंतर परिसरात जाणारे सर्व रस्ते बंद, इंटरनेट सेवाही...