AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Missing Link : मिसिंग लिंक सुरू झाला का? प्रवास करण्याआधी हे वाचाच, ट्रॅफिकबाबत मोठी अपडेट समोर!

मिसिंग लिंकवर दरड कोसळल्याने वाहतूक बंद करण्यात आलेली आहे. त्यानंतर दगड, चिखल काढण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर काम सुरू आहे. कोसळलेली 80 टक्के दरड बाजूला काढण्यात यश आलेलं आहे.

Missing Link : मिसिंग लिंक सुरू झाला का? प्रवास करण्याआधी हे वाचाच, ट्रॅफिकबाबत मोठी अपडेट समोर!
missing link trafficImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 06, 2026 | 7:40 PM
Share

Missing Link Traffic Update : पुणे, ठाणे, पालघर, कोकण, मुंबई या भागाला पावसाने झोडपून काढलं आहे. पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्येही तुफान पाऊस होत आहे. या पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रातील अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. तर मुंबईत अनेक ठिकाणी झाड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. मिसिंग लिंकवर दरड कोसळल्याने पुण्याहून मुंबईला येणाऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. दरम्यान, आता याच मिसिंग लिंकबाबत मोठी माहिती समोर आली आहे. पुण्याहून मुंबईला येणारी वाहतूक लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.

मुंबई ते पुणे दरम्यानची वाहतूक

मिसिंग लिंकवरील मुंबई ते पुणे दरम्यानची वाहतूक सुरू झाली आहे. परंतु मिसिंग लिंकवरील पुण्याहून मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक अजूनही बंदच आहे. ढिगारा हटवण्याचं 80 टक्के काम पूर्ण झालं आहे. पुढील दोन तासांत मिसिंग लिंक पूर्णपणे सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मिसिंग लिंकच्या टर्मिनल-2 टनलजवळ दरड कोसळली

पुणे आणि लोणावळा परिसरात 5 जुलैच्या रात्री तुफान पाऊस झाला होता. या पावसाचा फटका पुणे तसेच लोणावळा अशा दोन्ही भागांना बसला. काही दिवसांपूर्वीच सुरू झालेल्या मिसिंग लिंकलाही मोठा फटका सहन करावा लागला. मिसिंग लिंकवर दरड कोसळल्याने वाहतूक बंद झाली होती. मिसिंग लिंकच्या टर्मिनल-2 टनलजवळ दरड कोसळली होती. यामुळे मिसिंग लिंकची कमानही खाली कोसळली. ही घटना घडल्यानंतर रात्री सव्वा तीन वाजल्यापासून मिसिंग लिंक बंद ठेवण्यात आला होता.

80टक्के काम पूर्ण, लवकरच…

मिसिंग लिंकवर दरड कोसळल्याने वाहतूक बंद करण्यात आलेली आहे. त्यानंतर दगड, चिखल काढण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर काम सुरू आहे. कोसळलेली 80 टक्के दरड बाजूला काढण्यात यश आलेलं आहे. काही मलबा अजूनही तिथेच आहे. काही वेळेतच उर्वरित मलबा बाजूला काढला जाणार आहे. त्यानंतर पुण्याहून मुंबईला जाणारा मिसिंग लिंकचा मार्ग सुरू करण्यात येईल. गेल्या 15 तासांपासून पुण्याहून-मुंबईला जाणारा मिसिंग लिंकचा रस्ता बंद आहे. दुसरीकडे मिसिंग लिंकचा मुबंई ते पुणे हा मार्ग सुरू करण्यात आला आहे.

Follow Us
मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला
Abhijeet Dipke : मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला, मेट्रो-रेल्वे बंदीवरून सरकारवर निशाणा
रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने....
CJP Protest : सीजेपीचं उद्या दिल्लीत आंदोलन, रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने केंद्राला काय सांगितलं?
गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा
Gajanan Kirtikar : Shivsena : गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले...
एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर दीपकेंचा सरकारला टोला
Abhijeet Dipake : एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर अभिजित दीपकेंचा सरकारला टोला
ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच....
Shivsena : ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच, सर्वोच्च न्यायालयाकडून तारीख जाहिर
गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा बण यांच्यावर....
Vivekanand Patil : गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा नवनाथ बण यांच्यावर पलटवार, फडणवीसांनाही केलं आवाहन
CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
CJP Delhi Andolan : CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ?
Thackeray Group On Delhi Andolan : दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ? राष्ट्रपतींच्या भेटीवेळीही प्रतिनिधी....
सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून राऊतांनी...
Sanjay Raut : सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून संजय राऊतांनी सरकारला घेरलं
SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; सिब्बलांचा जुना व्हिडिओ
Devendra Fadnavis : SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; कपिल सिब्बलांचा जुना व्हिडिओ शेअर करत म्हणाले...