Parth Pawar Meets Raj Thackeray | शिवतीर्थावर पार्थ पवार यांची राज ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात
महाराष्ट्राच्या राजकारणात आज पार्थ पवार आणि राज ठाकरे यांची भेट हा चर्चेचा विषय बनला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते अजित पवार यांचे थोरले सुपुत्र पार्थ पवार आज अचानक शिवतीर्थ येथे दाखल झाले आणि तिथे त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली.
महाराष्ट्राच्या राजकारणात आज पार्थ पवार आणि राज ठाकरे यांची भेट हा चर्चेचा विषय बनला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते अजित पवार यांचे थोरले सुपुत्र पार्थ पवार आज अचानक शिवतीर्थ येथे दाखल झाले आणि तिथे त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. काही दिवसांपूर्वी रोहित पवार यांनीही शिवतीर्थवर येऊन राज ठाकरे यांची भेट घेतली होती, मात्र या भेटीमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आज पार्थ पवार यांनी भेटीनंतर कारमध्ये बसून तिथून निघून गेल्याने पत्रकारांशी काहीही बोलले नाही. त्यामुळे ही भेट का झाली?, हे अद्याप गूढच राहिले आहे. राजकीय चर्चांनुसार, पार्थ पवार यांचं नाव राज्यसभेसाठी चर्चेत आहे. सुनेत्रा पवार यांच्या जागी ते राज्यसभेवर खासदार म्हणून निवडले जाऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
Published on: Mar 30, 2026 01:33 PM
1 सप्टेंबरला OBC आंदोलनाचा एल्गार; हजारो वाहनांच्या रॅलीचा दावा
अमोल बालवडकरांविरोधात भाजपची सुनेत्रा पवारांकडे तक्रार
खाद्यतेल भेसळीविरोधात कठोर पाऊले. मुंढेंनी जाहीर केली नवीन नियमावली
अमित ठाकरेंच्या दौऱ्याच्या बॅनरवरून फोटोवॉर;जिल्हाध्यक्षांचा फोटो गायब

