
ऑपरेशन सिंदूरने चिनी शस्त्रास्त्रांची मर्यादा स्पष्ट केली. त्यानंतर आता म्यानमार सुरु असलेल्या लढाईतही चिनी शस्त्रांच्या क्षमतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केलय. म्यानमारमध्ये सैन्य आणि बंडखोर गटांमध्ये हिंसक संघर्ष सुरु आहे. म्यानमारच सैन्य चिनी फायटर जेट्समधून बंडखोरांवर बॉम्ब वर्षाव करत आहे. पण मंगळवारी बंडखोर गटाने एका चिनी जेटला लक्ष्य केलं. म्यानमारच्या स्थानिक मीडियानुसार बंडखोर गटाच्या फायटर्सनी म्यानमारच्या सैन्याच हे फायटर जेट पाडलं. म्यानमारने चीनकडून हे फायटर जेट विकत घेतलं होतं. या फायटर जेटची किंमत 72 कोटीच्या घरात आहे.
असोसिएटेड प्रेसने पीपुल्स लिबरेशन आर्मीच्या हवाल्याने लिहिलय की, म्यानमारच्या सैन्याने चिनी फायटर जेटच्या माध्यमातून बॉम्ब वर्षाव सुरु केला. लिबरेशन आर्मीच्या फायटर्सनी हे जेट पाडलं. चीन किंवा म्यानमारने अजून या घटनेवर अधिकृत टिप्पणी केलेली नाही. पीएलएचा दावा योग्य असेल तर तो चीनसाठी एक झटका आहे. पीएलएल फायटर्सकडे कुठलही अत्याधुनिक शस्त्र नाहीत. पीएलएचे फायटर्स मशीन गन आणि गनिमी काव्याच्या माध्यमातून म्यानमारच्या सैन्याविरुद्ध लढत आहेत.
किती अब्ज डॉलर्सची शस्त्र दिली?
साध्या मशीन गनने चिनी फायटर जेट पाडल असेल, तर चिनी शस्त्रांच्या क्रेडिबलिटीबद्दल मोठ प्रश्नचिन्ह निर्माण होतय. चीनने 2023 साली म्यानमारला 1 अब्ज डॉलर्सची शस्त्रास्त्र दिली होती. म्यानमारशिवाय चीन पाकिस्तानला सुद्धा शस्त्र विकतो. न्यूयॉर्क टाइम्समध्ये अलीकडेच एक रिपोर्ट प्रकाशित झाला होता. त्यानुसार, चीनच्या सांगण्यावरुन पीएलए बंडखोरांनी म्यानमार सैन्याकडून जिंकलेल्या जमिनीवरील ताबा सोडला होता.
फायटर जेट पाडण्यासाठी कुठली गन वापरली?
मशीन गनच्या माध्यमातून फायटर जेट पाडण्यात आलं असा प्रत्यक्षदर्शीच्या हवाल्याने स्थानिक वर्तमानपत्र द इरावड्डीने दावा केलाय. प्रत्यक्षदर्शीनुसार 0.50 कॅलिबर एम2 ब्राउनिंग मशीन गनच्या माध्यमातून विमान पाडण्यात आलं. सरकार आणि पीएलएकडून या बद्दल अजून टिप्पणी करण्यात आलेली नाही. 4 जून रोजी सागाइंगच्या पाले टाऊनशिपमध्ये कान दौक पोलीस स्टेशन ताब्यात घेण्यासाठी अभियान सुरु केलं होतं, अशी माहिती PLA ने दिली. या दरम्यान म्यानमार सैन्याच्या फायटर जेट आणि Y-12 विमानांनी मोठ्या प्रमाणात बॉम्बवर्षाव केला. यावेळी प्रत्युत्तराच्या कारवाईत PLA ने 50 कॅलिबरच्या M2 ब्राउनिंग मशीन गनने त्यांच्यावर बॉम्ब वर्षाव करणारं फायटर जेट पाडलं.