UNGA : संयुक्त राष्ट्रामध्ये परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पाकिस्तानची चांगलीच खरडपट्टी काढली

संयुक्त राष्ट्र महासभेच्या मंचावरुन बोलताना पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी, भारतासोबत 2025 मध्ये झालेल्या संघर्षात वेळीच हस्तक्षेप केल्याबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानले होते.

UNGA : संयुक्त राष्ट्रामध्ये परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पाकिस्तानची चांगलीच खरडपट्टी काढली
s jaishankar
| Updated on: Sep 27, 2026 | 7:33 AM

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी न्यू यॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्र महासभेच्या 81 व्या सत्राला संबोधित केलं. दहशतवादाच्या बाबतीत भारताचं झीरो टॉलरेन्स धोरण असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. पाकिस्तानवरही निशाणा साधला. दहशतवादाला सतत प्रोत्साहन देणाऱ्या एका देशाने या सभागृहासमोर तथ्य चुकीच्या पद्धतीने सादर केली, असं यूएनजीएच्या 81 व्या उच्चस्तरीय सत्रातील चर्चेदरम्यान जयशंकर म्हणाले. दहशतवादाविरुद्ध स्वत:चा बचाव करण्याच्या अधिकाराचा आम्ही वापर करत राहू असं परराष्ट्र मंत्री म्हणाले. “दहशतवादाविरुद्ध आमचं झीरो टॉलरेन्स धोरण कायम राहिलं. त्यात कुठलीही नरमाई येणार नाही. त्याशिवाय जगात सुरु असलेली युद्ध संपली पाहिजेत ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका आहे” असं जयशंकर म्हणाले.

पाकिस्तानचं नाव न घेता जयशंकर म्हणाले की, “दहशतवाद सामान्य ठरवण्यासारखा युक्तीवाद टिकणार नाही. दहशतवादाविरुद्ध बचाव करण्याचा आमचा अधिकार आहे, त्याचा आम्ही वापर करु. मैत्री आणि दहशतवाद एकत्र चालू शकत नाही” “दहशतवाद पसरवणाऱ्यांना आपली भूमिका बदलावी लागेल. दहशतवादच शांततेसाठी धोकादायक आहे. अशा घडामोडींमध्ये सहभागी असलेल्या देशांनी उत्तर द्यावीत” असं जयशंकर म्हणाले.

पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ काय म्हणाले?

संयुक्त राष्ट्र महासभेच्या मंचावरुन बोलताना पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी, भारतासोबत 2025 मध्ये झालेल्या संघर्षात वेळीच हस्तक्षेप केल्याबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानले होते. आपल्या 23 मिनिटाच्या संबोधनात शरीफ यांनी काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. दक्षिण आशियात 2025 सारखी पुन्हा संघर्षाची स्थिती निर्माण होऊ नये हे सुनिश्चित करावं, काश्मीर मुद्यावर न्यायपूर्ण आणि निष्पक्ष तोडगा काढावा अशा मागण्या केल्या.

युद्ध न होणं हाच फक्त शांततेचा अर्थ नाहीय

पश्चिम आशियात म्हणजे मीडिल ईस्टमधील तणाव आणि हिंसाचारावर एस जयशंकर यांनी आपल्या संबोधनात दु:ख व्यक्त केलं. ‘टू-स्टेट सॉल्यूशन’चं कायमस्वरुपी शांततेचा मार्ग आहे हे जयशंकर यांनी ठामपणे सांगितलं. परिस्थिती सुधारणासाठी भारत आपल्याबाजूने शक्य ते सर्व करायला तयार आहे असं जयशंकर म्हणाले. पॅलेस्टिनी जनतेसाठी मानवी सहाय्यता आणि मदत कार्यात भारत योगदान देत असल्याचं ते म्हणाले. युद्ध न होणं हाच फक्त शांततेचा अर्थ नाहीय, तर जग सतत धोक्याचा आणि दबावाचा सामना करतय. आपण एका खोल दरीच्या दिशेने चाललो आहोत. शांततेसाठी अनुकूल वातावरण गरजेचं असल्याचं ते म्हणाले.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us