अमेरिकेची इराणला धमकी, आता युद्ध…भारतानेही घेतला सर्वात मोठा निर्णय; थेट आदेश काढला!

सध्या इराणमध्ये अराजक माजले आहे. इराणधील नागरिक रस्त्यावर उतरले असून तिथे तणावाची स्थिती आहे. अमेरिकेने या आंदोलनास पाठिंबा दिला आहे. असे असतानाच आता भारताने मोठा निर्णय घेतला आहे.

अमेरिकेची इराणला धमकी, आता युद्ध...भारतानेही घेतला सर्वात मोठा निर्णय; थेट आदेश काढला!
iran protest
Image Credit source: tv9 marathi
Prajwal Dhage | Updated on: Jan 14, 2026 | 4:34 PM

Iran Conflict : सध्या इराणध्ये अराजक माजले आहेत. तिथे सध्या सरकारविरोधात मोठ्या आंदोलनाचा उद्रेक झाला आहे. हजारो लोक रस्त्यावर उतरले आहेत. अनेक ठिकाणी हिसंक कारवाया चालू आहेत. सरकारी कार्यालयांना आग लावून दिली जात आहे. तर काही ठिकाणी तोडफोड केली जातेय. हे आंदोलन थोपवण्यासाठी इराणी सरकारकडून दडपशाहीचा वापर केला जातोय. या आंदोलनात आतापर्यंत हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. अजूनही तेथील परिस्थिती निवळलेली नाही. असे असतानाच या आंदोलनाला अमेरिकेकडून पाठिंबा मिळत आहे. लवकरच अमेरिका आंदोलकांना मदत पाठवणार आहे. या सर्व घडामोडी लक्षात घेऊ आता भारत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. इराणमध्ये असलेल्या भारतीय नागरिकांना भारत सरकराने महत्त्वाचा सल्ला दिला आहे.

भारताने नेमका काय सल्ला दिला आहे?

सध्या इराणमधील परिस्थिती लक्षात घेऊन भारताच्या सरकारने इराणधील भारतीय नागरिकांना महत्त्वाचे दिशानिर्देश दिले आहेत. तिथे शिक्षणासाठी तसेच व्यवसायासाठी गेलेल्या भारतीय नागरिकांनी लवकरात लवकर तो देश सोडावा, असे भारताने सांगितले आहे. हे दिशानिर्देश सर्वांनाच लागू आहेत. त्यामुळे आता इराणमधील सर्व भारतीय नागरिक भारतामध्ये परतण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. भारताने इराणमध्ये असलेल्या भारतीयांनी आपले पासपोर्ट, ओळखपत्र तसेच इतर कागदपत्रे तयार ठेवावीत, असेही सांगिले आहे. इराण सोडण्यास काही अडचणी येत असतील तर भारताने त्यासाठी हेल्पनाईन नंबरही जारी केला आहे. आपत्कालीन स्थितीत इराणमध्ये फसलेल्या भरतीय नागरिकांनी +989128109115; +989128109109; +989128109102; +989932179359 या मोबाईल क्रमांकावर किंवा cons.tehran@mea.gov.in या इमेलवर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अमेरिकेच्या भूमिकेमुळे तणाव

इराणधील सर्वोच्च नेते खामेनी यांनी आंदोलकांना ठार करण्याचा आदेश दिलेला आहे. त्यामुळेच अनेक आंदोलकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीदेखील इराणमधील आंदोलकांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे. आम्ही लवकरच तुम्हाला रसद पाठवू असे ट्रम्प यांनी सांगितलेले आहे. त्यामुळे इराणवर कोणत्याही क्षणी अमेरिका हल्ला करू शकते, असा कयास लावला जात आहे. त्यामुळे आता भविष्यात नेमके काय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.