AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Donald Trump Tariff : पंतप्रधान नरेंद्र मोदी महान, सज्जन, बुद्धिमान व्यक्ती पण..ट्रम्प भारताबद्दल जे मनात होतं, ते थेट बोलले

Donald Trump Tariff : अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने काल डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ निर्णयाला झटका दिला. त्यांच्या सुप्रीम कोर्टाने टॅरिफ रद्द केला. त्यानंतर आता भारत-अमेरिका ट्रेड डीलवर काही परिणाम होणार का? भारताला टॅरिफ मध्ये अजून सवलत मिळणार का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

Donald Trump Tariff : पंतप्रधान नरेंद्र मोदी महान, सज्जन, बुद्धिमान  व्यक्ती पण..ट्रम्प भारताबद्दल जे मनात होतं, ते थेट बोलले
Modi-Trump Image Credit source: TV9 Hindi
| Updated on: Feb 21, 2026 | 1:15 PM
Share

अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी ऐतिहासिक निकाल दिला. डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेला टॅरिफचा निर्णय रद्द केला. त्यामुळे या निर्णयाचा भारत-अमेरिका ट्रेड डीलवर काही परिणाम होणार का? भारताला टॅरिफ मध्ये अजून सवलत मिळणार का? असे प्रश्न उपस्थित झाले. डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केलय की, टॅरिफ रद्द झाला असला, तरी भारत-अमेरिका ट्रेड डीलमध्ये काही बदल होणार नाही. टॅरिफ सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला असला, तरी भारताला 18 टक्के टॅरिफ भरावाच लागेल. भारतासोबत झालेल्या करारावर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा काय परिणाम होईल? त्या प्रश्नावर ट्रम्प म्हणाले की, “काही बदलणार नाही. त्यांना टॅरिफ द्यावा लागेल आणि आम्ही देणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी एक महान व्यक्ती आहेत. पण ट्रेड डीलमध्ये काही बदल होणार नाही”

“भारतासोबत माझे शानदार संबंध आहेत. आम्ही भारतासोबत व्यापार करत आहोत. भारत रशियासोबत संबंध तोडून वेगळा झालाय. भारत रशियाकडून तेल खरेदी करत होता. माझ्या विनंतीवरुन भारताने त्यांच्यासोबत संबंध बऱ्याच प्रमाणात कमी केलेत. कारण आम्हाला एक भयानक युद्ध संपवायचं आहे. दर महिन्याला त्यात 25 हजार जणांचा बळी जातोय” असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. “माझे पंतप्रधान मोदींसोबत चांगले संबंध आहेत. मी भारत-पाकिस्तान युद्ध सुद्धा थांबवलं. मी मुख्यपणे टॅरिफ लावून हे काम केलं. मी म्हटलं, तुम्हाला लढायचय, लढा. पण तुम्ही अमेरिकेसोबत व्यापार करु शकत नाही. आम्ही तुमच्यावर 200 टक्के टॅरिफ लावू. त्यांनी फोन करुन सांगितलं, आम्ही शांतता स्थापित केलीय” असा दावा ट्रम्प यांनी केला.

आम्ही त्यांना टॅरिफ देत नाहीय

“कोर्टाच्या निर्णयाने काही बदलणार नाही. भारताला टॅरिफ द्यावाचं लागेल.पंतप्रधान नरेंद्र मोदी एक सज्जन आणि महान व्यक्ती आहेत. ते आपल्या विरोधकांपक्षा खूप बुद्धिमान आहेत. आम्ही भारतासोबत एक करार केलाय. हा एक योग्य करार आहे. आम्ही त्यांना टॅरिफ देत नाहीय. ते आम्हाला टॅरिफ देतायत” असं ट्रम्प म्हणाले.

भारताच्या कुठल्या वस्तूंवर टॅरिफ लागणार?

अमेरिका भारतात उत्पादन झालेल्या वस्तुंवर 18 टक्के टॅरिफ लावणार. यात वस्त्र आणि कपडे आहेत. चामडं, बूट, प्लास्टिक, रबर उत्पादनं, जैविक रसायन, घरगुती सजावट, हस्तशिल्पाच्या वस्तू आणि काही मशिनरी आहेत. ट्रम्प यांनी अमेरिकेत आयात होणाऱ्या सामानावर टॅरिफ वाढवण्यासाठी 1977 सालच्या इंटरनॅशनल इमर्जन्सी इकोनॉमिक पावर्स एक्टचा (IEEPA) वापर केला. पण त्यांच्या सुप्रीम कोर्टाने हा टॅरिफ रद्द केला.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा