AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

US SC On Tariff : ट्रम्प यांची नाचक्की झाली तो IEEPA एक्ट काय? आता टॅरिफ वाढवण्यासाठी US समोर दुसरे मार्ग काय?

US SC On Tariff : टॅरिफचा निर्णय रद्द करुन अमेरिकी सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका दिला. त्यानंतर ट्रम्प यांनी लगेच आपले अधिकार दाखवण्यासाठी 10% ग्लोबल टॅरिफ लावला. आता हा 10 टक्के टॅरिफ वसूल करण्यासाठी अमेरिकेकडे इतर कायदेशीर मार्ग काय आहेत? जाणून घ्या.

US SC On Tariff : ट्रम्प यांची नाचक्की झाली तो IEEPA एक्ट काय? आता टॅरिफ वाढवण्यासाठी US समोर दुसरे मार्ग काय?
Donald Trump Image Credit source: PTI
| Updated on: Feb 21, 2026 | 9:29 AM
Share

टॅरिफच्या बाबतीत अमेरिकी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का बसला आहे. अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांची यावर प्रतिक्रिया आली आहे. सुप्रीम कोर्टाने फक्त दुसऱ्या देशांवर टॅरिफ लावण्यासाठी इंटरनॅशनल इमर्जन्सी इकोनॉमिक पावर्स एक्टचा (IEEPA) वापर करण्यावर स्थगिती आणली आहे असं बेसेंट म्हणाले. टॅरिफ रेवेन्यूमध्ये कोणताही बदल होणार नाही तसचं ट्रम्प प्रशासन यापुढे टॅरिफ लावण्यासाठी ‘अल्टरनेटिव लीगल अथॉरिटीज़’चा वापर करेल. हे IEEPA काय आहे? ज्यामुळे ट्रम्प प्रशासनाची इतकी नाचक्की झाली. डलास इकोनॉमिक क्लबमध्ये अर्थ मंत्री बेसेंट सारवासारव करताना म्हणाले की, “सु्प्रीम कोर्टाने राष्ट्रपती ट्रम्प यांच्या टॅरिफ विरोधात कोणताही निर्णय दिलेला नाही. फक्त सहा न्यायाधीशांच्या खंडपीठाने एवढच म्हटलय की, एकाही यूएस डॉलरचा रेवेन्यू मिळवण्यासाठी IEEPA अथॉरिटीजचा वापर करता येणार नाही”

“आमचं प्रशासन IEEPA टॅरिफ बदलण्यासाठी अल्टरनेटिव लीगल अथॉरिटीजचा वापर करेल. आम्ही सेक्शन 232 आणि सेक्शन 301 टॅरिफ अथॉरिटीजचा वापर करु. हजारो कायदेशीर प्रकरणात या सेक्शन्सला अधिकृत ठरवलेलं आहे” असं स्कॉट बेसेंट म्हणाले. सुप्रीम कोर्टाने झटका दिल्यानंतरही अर्थ मंत्री बेसेंट यांचं म्हणणं आहे की, “2026 ला टॅरिफ रेवेन्यूमध्ये कोणताही बदल होणार नाही. कारण प्रशासन दुसर्‍या पद्धतीचा अवलंब करेल” अमेरिकी सर्वोच्च न्यायलयाने 6-3 ने ट्रम्प प्रशासनाचा टॅरिफचा निर्णय रद्द केला. ट्रम्प यांनी अमेरिकेत आयात होणाऱ्या सामानावर टॅरिफ वाढवण्यासाठी 1977 सालच्या इंटरनॅशनल इमर्जन्सी इकोनॉमिक पावर्स एक्टचा (IEEPA) वापर केला.

10 टक्के ग्लोबल टॅरिफ लावण्याचा निर्णय कोणत्या निकषांच्या आधारे?

सुप्रीम कोर्टाकडून मोठा कायदेशीर धक्का बसल्यानंतर ट्रम्प यांनी 10 टक्के ग्लोबल टॅरिफ तात्काळ प्रभावाने लागू केला आहे. ट्रम्प यांनी कोर्टाच्या निर्णयाला वाईट निर्णय ठरवलं आहे. ट्रम्प यांनी जाहीर केलय की, 1974 सालच्या ट्रेड एक्ट सेक्शन 122 अंतर्गत 10 टक्के ग्लोबल टॅरिफसाठी एग्जीक्यूटिव ऑर्डरवर स्वाक्षरी करणार आहेत. ही अथॉरिटी 150 दिवसांसाठी टेम्पररी इंपोर्ट सरचार्ज (15%) वाढवण्याची परवानगी देते.

IEEPA कायदा काय आहे?

लाइब्रेरी ऑफ काँग्रेसनुसार, IEEPA वर्ष 1977 बनवण्यात आलेला कायदा आहे. हा कायदा अमेरिकी राष्ट्रपतींना नॅशनल इमर्जन्सी दरम्यान मोठे अधिकार देतो. IEEPA चा अर्थ इंटरनॅशनल इमर्जन्सी इकोनॉमिक पावर्स एक्ट. हा अमेरिकेचा संघीय कायदा आहे, जो राष्ट्रपतींना नॅशनल इमर्जन्सी दरम्यान इंटरनॅशनल इकोनॉमिक व्यवहार नियमित करण्याचे अधिकार देतो. हा एक्ट राष्ट्रपतींना इकोनॉमिक बॅन लावणं. एसेट्स फ़्रीज करणं आणि अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेला ज्यांच्यापासून धोका आहे, असे देश किंवा संस्थांसोबत व्यापार रोखण्याचे अधिकार देतो.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा