AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

US SC On Tariff : ‘न्यायाधीशांची लाज वाटते’, ट्रम्प इतकी तणतण करतायत त्या अमेरिकी SC च्या आदेशात टॅरिफ बद्दल नेमकं काय म्हटलय?

US SC On Tariff : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना टॅरिफच्या मुद्यावर मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने काल टॅरिफच्या बाबतीत निकाल दिला. भारताने या अमेरिकन टॅरिफची सर्वाधिक झळ सहन केलीय. भारतावर 50 टक्के टॅरिफ होता. अमेरिकी सुप्रीम कोर्टाने त्यांच्या आदेशात काय म्हटलय जाणून घ्या.

US SC On Tariff : 'न्यायाधीशांची लाज वाटते', ट्रम्प इतकी तणतण करतायत त्या अमेरिकी SC च्या आदेशात टॅरिफ बद्दल नेमकं काय म्हटलय?
Donald Trump Tariff
| Updated on: Feb 21, 2026 | 8:31 AM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांच्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने टॅरिफच्या विषयात सर्वात मोठा झटका दिला आहे. ट्रम्प यांना हा निर्णय सहनच झाला नाही. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर कठोर शब्दात टीका केली आहे. “कोर्टाचा हा निर्णय निराशाजनक आहे. आम्हाला अशा निर्णयाची अपेक्षा नव्हती. सर्वोच्च न्यायालयाने आमचं म्हणणं ऐकलं नाही. कोर्टाचा निर्णय अमेरिकेच्या हिताचा नाही” अशा शब्दात ट्रम्प यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. अमेरिकन सुप्रीम कोर्टाने टॅरिफच्या बाबतीत ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यांनी ट्रम्प यांच्या ग्लोबल टॅरिफला बेकायदेशीर ठरवून रद्द करण्याचा आदेश दिला. ट्रम्प यांनी मागच्यावर्षी अनेक देशांवर तडकाफडकी टॅरिफ लावला होता. अमेरिकी अर्थव्यवस्थेसाठी हे आवश्यक पाऊल असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. त्यांनी टॅरिफच्या बाबतीत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर कठोर टीका केली. “मला अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाच्या काही न्यायाधीशांची लाज वाटते. न्यायाधीशांमध्ये देशासाठी योग्य काम करण्याची हिम्मत नाही” अशा शब्दात ट्रम्प यांनी मनातली अस्वस्थतता व्यक्त केली.

पण ते जास्त काळ आनंदी राहणार नाहीत

“सुप्रीम कोर्टाचा निर्णय अमेरिकेच्या हिताचा नाही. न्यायालयं परदेशी हितांमुळे प्रभावित होतात. मला अशा निर्णयाची अपेक्षा नव्हती. जे देश अनेक वर्षांपासून आपल्याला लुटतायत ते या निर्णयामुळे खुश होतील. पण ते जास्त काळ आनंदी राहणार नाहीत. आम्ही दुसऱ्या पर्यायाचा वापर करु. आम्ही कदाचित अजून जास्त पैसे घेऊ. माझ्याकडे अजून भक्कम पर्याय उपलब्ध आहेत” असं ट्रम्प म्हणाले.

आर्थिक अजेंड्यासाठी मोठा धक्का

“अमेरिकन सुप्रीम कोर्टातील त्या न्यायाधीशांची मला लाज वाटते, ज्यांनी टॅरिफबद्दल खूपच निराशाजनक निर्णय घेतला आहे” असं ट्रम्प म्हणाले. अमेरिकी सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी ट्रम्प प्रशासनाने अनेक देशांविरोधात लावलेला व्यापक टॅरिफ वृद्धीचा आदेश रद्द केला. हा निर्णय ट्रम्प यांच्या आर्थिक अजेंड्यासाठी मोठा धक्का असल्याचं मानलं जातय.

अमेरिकी सुप्रीम कोर्टाने आदेशात काय म्हटलं?

अमेरिकन सुप्रीम कोर्टाने 6-3 अशा बहुमताने हा निर्णय घेतला. इमर्जन्सी पावर कायद्यातील अधिकारांचा वापर करुन ट्रम्प यांनी टॅरिफ वाढवण्याचा निर्णय घेतला होता. टॅरिफ हा ट्रम्प यांच्या व्यापक आर्थिक अजेंड्याचा पहिला महत्वपूर्ण हिस्सा आहे, जो थेट विषय सुप्रीम कोर्टासमोर आला. “ट्रम्प यांनी पाच दशकापूर्वीच्या आंतरराष्ट्रीय इमर्जन्सी इकोनॉमिक पावर कायद्याचा चुकीचा वापर केला. त्यांची ही पद्धत ठीक नव्हती. टॅरिफ लावण्याचा अधिकार ट्रम्प यांच्याकडे नाही, तर अमेरिकी संसदेकडे आहे” असं कोर्टाने आपल्या आदेशात म्हटलं आहे.

Follow Us
डोळ्यांसमोर 4 एकर पीक करपलं; हजारोंचं नुकसान, शेतकरी संकटात
डोळ्यांसमोर 4 एकर पीक करपलं; हजारोंचं नुकसान, शेतकऱ्याची व्यथा ऐकून डोळे पाणावतील
या वयातही शेतकऱ्यांच्या बांधावर...; शरद पवारांच्या दौऱ्याबाबत राऊत...
या वयातही शेतकऱ्यांच्या बांधावर...; शरद पवारांच्या दौऱ्याबाबत संजय राऊतांचं विधान
जिल्हा मध्यवर्ती बँकेत लाखोंची उलाढाल, बड्या अधिकाऱ्याची ऑडिओ क्लिप...
जिल्हा मध्यवर्ती बँकेत लाखोंची उलाढाल, बड्या अधिकाऱ्याची ऑडिओ क्लिप व्हायरल होताच...
भाजपमध्ये जाणाऱ्या काँग्रेस नेत्याला थेट राहुल गांधींचा फोन; नंतर...
भाजपमध्ये जाणाऱ्या काँग्रेस नेत्याला थेट राहुल गांधींचा फोन; नंतर... नेमकं काय घडलं?
मेथीची भाजी डब्यात आणली म्हणून 50 रुपयांचा दंड; तपोवन विद्यालयावर मनसे
मेथीची भाजी डब्यात आणली म्हणून 50 रुपयांचा दंड; तपोवन विद्यालयावर मनसे आक्रमक
केंद्रीय सचिवाकडून चंद्रशेखर बावनकुळेंचं कौतुक, महाराष्ट्रातील पॅटर्न
केंद्रीय सचिवाकडून चंद्रशेखर बावनकुळेंचं कौतुक, महाराष्ट्रातील हा पॅटर्न देशभर राबवणार
बदलापूर जलमय! मुसळधार पावसाने रस्ते पाण्याखाली, वाहतूक कोंडीने नागरिक
बदलापूर जलमय! मुसळधार पावसाने रस्ते पाण्याखाली, वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात...
Ajit Pawar : अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात याचा अहवाल महिनाभरातच; AAIBचं आश्वासन
मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात...
Mumbai Bank Election : मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंची एन्ट्री; सहकार क्षेत्रात रंगणार चुरस
भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, अन्...
Bhandara : भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, धक्काबुक्की अन् थेट... VIDEO चर्चेत