AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताची मोठी चिंता मिठली, या छोट्या देशाने मैत्री निभावली, युद्धकाळात करतोय खोऱ्याने तेल पुरवठा

आता आफ्रिकन देश महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. अमेरिका रशियन तेल रोखण्यासाठी आयात शुल्क लादत आहे, तर युरोप नवीन व्यापार आणि संरक्षण करार करत आहे. याचा फायदा अंगोलासारख्या देशांना होत आहे.

भारताची मोठी चिंता मिठली, या छोट्या देशाने मैत्री निभावली, युद्धकाळात करतोय खोऱ्याने तेल पुरवठा
ANGOLA
| Updated on: Apr 03, 2026 | 7:28 PM
Share

इराण युद्धामुळे जगभरातील देशांवर इंधनाचे मोठे संकट उभे राहिले आहे. इराण- अमेरिका आणि इस्रायल युद्ध आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे भारताने इंधन खरेदीची रणनीती बदलली आहे. आता आफ्रीकन देश अंगोला भारतासाठी एक महत्वाचा इंधन पुरवणारा देश म्हणून समोर आला आहे. भारत रशियावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी अंगोलामधून जास्त इंधन खरेदी करत आहे. अलिकडे भारताने अंगोलाहून सुमारे २० लाख बॅरल कच्चे तेल खरेदी केले आहे. ही खरेदी इंडियन ऑईल कार्पोरेशनने केली आहे. ज्यात हंगो आणि क्लोव्ह ग्रेडच्या प्रत्येकी १० लाख बॅरल इंधनाचा समावेश आहे.

ही डील ExxonMobil द्वारे झाली आहे. हे दोन्ही प्रकारचे इंधन आशियाई रिफायनरीसाठी उत्तम मानले जाते. कारण यापासून जास्त पेट्रोल-डिझेल बनते. अंगोला, नायजेरिया नंतर आफ्रीकेचा दुसरा सर्वात मोठा इंधन उत्पादक देश आहे. येथे रोज सुमारे ११ लाख बॅरल कच्चे तेल निघते. या देशाच्या जवळ सुमारे ७.७८ अब्ज बॅरल तेलाचे भंडार आहे. यामुळे भारतासारख्या देशांसाठी एक महत्वपूर्ण पर्याय बनत चालला आहे.

भारताने बदलली रणनीती

भारत आता केवळ एकाच देशावर निर्भर राहू इच्छीत नाही. या कारणाने त्याने दुसऱ्या देशांशी इंधन खरेदी वाढवली आहे. Shell मधून अबू धाबीचे मर्बन ऑईल, मर्करिया ग्रुपमधून अपर झाकुम आणि पेट्रोब्रासकडून ब्राझीलचे Buzios इंधन खरेदी केले आहे. यामुळे भारताने आपला पुरवठा सुरक्षित आणि संतुलित केले आहे.

२०२२ मध्ये रशिया सर्वात मोठा पुरवठादार

२०२२ मध्ये झालेल्या रशिया-युक्रेन युद्धानंतर, रशियाने भारताला स्वस्तात मोठा तेल पुरवठा केला. मात्र, त्यानंतर रशियावर कठोर निर्बंध लादण्यात आले, ज्यामुळे भारताने आपली रणनीती बदलली. डिसेंबरमध्ये, रशियाकडून होणारी तेल आयात दोन वर्षांतील नीचांकी पातळीवर पोहोचली, तर ओपेक देशांकडून होणारी आयात वाढली.

आफ्रीकन देशातून आयात वाढली

सरकारने गॅसचे पर्यायी स्रोत शोधणे, ओमान, नायजेरिया आणि अंगोलाकडून खरेदी वाढवण्याची निर्णय घेतला आहे. आकडेवारीनुसार फेब्रुवारी २०२६ मध्ये एकूण एलएनजीची आयात १९.३ लाख टन होती. जी मार्च २०२६ मध्ये घटून १६.७ लाख टन राहिली होती. म्हणजे सुमारे १३ टक्के कमी आली आहे. कतारमधून आयातीत मोठी घसरण झाली आहे. अमेरिका, ओमान, नायजेरिया आणि अंगोला येथून आयात ( १,४१,४४९ टनाने वाढून २,०८,०५९ ) वाढली आहे. युएईमधून आयातीत कमी झाली आहे. ज्यामुळे पुरवठ्यात बदल स्पष्ट दिसत आहे.

अंगोला इंधनाचा तिसरा सर्वात मोठा पुरवठादार

मार्च २०२६ मध्ये अंगोलामधून कच्चे तेलाचा तिसरा सर्वात मोठा पुरवठादार म्हणून पुढे आला आहे. ज्याच्या सप्लायमध्ये रशियानंतर सर्वात जास्त वाढ झाली आहे. आकड्यानुसार रशियातून आयात १,०४२ ने वाढून १,९७५ हजार बॅरल झाली आहे. इराककडून आयात घटून ९६९ ने घटून २३५ राहिली आहे. सौदी अरबमधून आयात १,०३६ वरुन ५७२ झाली आहे. युएई, अमेरिका आणि नायजेरियामधून आयातीत कमी झाली आहे. मात्र, अंगोलाहून आयात १०३ ने वाढून ३२७ हजार बॅरलला गेली आहे. एकूण आयात फेब्रुवारीच्या ५,२०२ ने घटून मार्चमध्ये ४,४३९ हजार बॅरल राहिली आहे. म्हणजे एकूण १५ टक्के घसरण झाली आहे.

Follow Us
वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा
मोठी बातमी! वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा आक्रोश
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण! "काका मला मारू नका, मी...
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण!
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा Video समोर
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिय
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिया सुळेंनी पक्षातील Inside Story सांगितलीच
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले..
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले...
थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
मोठी बातमी! थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार; उपमुख्यमंत्री शिंदेंचे विधान
राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
Bachchu Kadu | राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर
Pandharpur Wari | टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर दिवेघाट सर करत वारी चालली पंढरी
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं,
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं, कोण आहे पवार कुटुंबातील होणारी सून?