AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराणच्या होर्मुझ ऑईल टोल बूथवर अमेरिकन सैन्याचा मोठा हल्ला, केशम आयलँडमध्ये हाहाकार

इराणसाठी या युद्धात स्ट्रेट ऑफ होर्मुझ ही सामुद्रधुनी मोठी ताकद ठरली आहे. याच होर्मुझवर केशम आयलँड आहे. आजकाल केशम आयलँड येथून इराणच्या परवानगी शिवाय कोणत्याही जहाजाला जाता येत नाही. मात्र, आता अमेरिकेने या आयलँडवर हल्ला केला आहे.

इराणच्या होर्मुझ ऑईल टोल बूथवर अमेरिकन सैन्याचा मोठा हल्ला, केशम आयलँडमध्ये हाहाकार
US Attaked on qeshm island
| Updated on: Apr 03, 2026 | 4:22 PM
Share

इराण युद्धाला एक महिना झाला आहे. इराणने होर्मुझवर निर्बंध आणल्याने अनेक देशांचा इंधन पुरवठा बाधित झाला आहे.मात्र, इराणला ज्याचा गर्व होता त्या स्ट्रेट ऑफ होर्मुझवर जेथे टोल बसवला होता तेथे आता युद्धाची ठिणगी पोहचली आहे. अमेरिकेने या केशम बेटावर दणादण बॉम्बचा वर्षाव केला आहे. सॅटेलाईटमध्ये आलेल्या फोटोंनी यास वृत्ताला दुजोरा दिला आहे. अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त कारवाईने केशम बेटावरील पोर्टला मोठे नुकसान झाले आहे.

रॉयटर्स या वृत्तसंस्थेने कोपर्निकस सेंटिनल – २ च्या फोटोंचा हवाला देत सांगितले की गुरुवारी बेटांवरील बंदराच्या ठिकाणी धुराचे लोट उठताना पाहायला मिळाले आहे. रॉयटर्सने बंदराच्या लेआऊटचा मिलानच्या आधीचे फोटो आणि सॅटेलाईट डेटा एकत्र करुन या जागेवर हल्ला झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

बहमन कमर्शियल बंदर आणि दोहा मच्छीमारी होणाऱ्या घाटाच्या काही भागाचे नुकसान झाल्याचे केशम फ्री झोनच्या अधिकाऱ्या हवाल्याने वृत्त देण्यात आले आहे. हा हल्ला १ एप्रिलच्या सायंकाळी २ एप्रिलच्या दुपार या दरम्यान बिच केशम पोर्टच्या पायाभूत सुविधांना लक्ष्य करुन करण्यात आला.

सॅटेलाईटद्वारा जारी केलेल्या फोटोंमध्ये केशम पोर्टमधून धुरांचे लोट वाहताना दिसत आहेत. फोटोत केशम पोर्टच्या एक भागाचा किनारा तुटलेला दिसत आहे. दुसरीकडे इराणने वेगळाच दावा केला आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड्सच्या कॉर्प्स (IRGC) ने घोषणा केली आहे की इराणी एअर डिफेन्स सिस्टीमने केशम बेटाच्यावर शत्रूच्या विमानाला यशस्वीपणे टार्गेट केले आहे. इराणच्या सरकारी मीडिया प्रेस टीव्हीने या हल्ल्याचे फोटो जारी केले आहे.आपल्या लढाऊ विमानाला टार्गेट केलेले नाही आणि इराणचा दावा चुकीचा आहे असे अमेरिकेने म्हटले आहे.इराणच्या आयआरजीसीने सहा वेळा खोटे सांगितले आहे असे अमेरिकेने म्हटले आहे.

येथे पोस्ट पाहा –

इराणने त्याच्या दाव्यात एक व्हिडीओ एक्सवर शेअर केला आहे. त्यात एक विमान कोसळताना दिसत आहे. केशम आयलँड हे इराणचे प्राईड आहे. इराण समुद्रात जेथे टोल टॅक्स एकत्र करतो ती जागा लरक आणि केशम आयलँडच्या दरम्यान आहे. या दोन बेटांच्या दरम्यान जहाजे ये जा करतात.आणि याच वेळी इराणने या जहाजांकडून टोल टॅक्स वसुल करण्यास सुरुवात केली आहे.

येथे पोस्ट पाहा –

येथून जहाजांना येजा करण्यासाठी इराणच्या अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागते. या मार्गातून इराण केवळ त्याच देशांच्या जहाजांना जाण्याची मंजूरी देतो ज्या देशांशी त्यांचे संबंध चांगले आहेत. काही तेलाने भरलेल्या जहाजांना येथून जाण्यासाठी २० लाख डॉलरचा टोल टॅक्स इराणला द्यावा लागला होता.

आता केशम आयलँडवर केला हल्ला

इराणच्या मेहर न्यूज एजन्सीने देखील सांगितले की या घटनेत कोणाचाही मृत्यू झाल्याची बातमी नाही. तसेच येथील केशम फ्री झोनचे उपप्रमुख मंसुर अजीमजादेह अर्देबिली यांनी सांगितले की बहमन बंदर संपूर्णपणे व्यावसायिक सुविधा आहे. यावर केलेला कोणताही हल्ला हा आंतरराष्ट्रीय मानदंडाचे उल्लंघन मानले जाईल.

Follow Us
अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं
Andheri Accident | अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं, रिक्षांचा चुराडा
अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Devendra Fadnavis on Ajit Pawar Accident | अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर CM फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Devendra Fadnavis | कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून शिंदेंचा ठाकरे गटावर...
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल
रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही..
Ramesh Mhatre | डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही कारवाईचे संकेत?
सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
Sudhir Mungantiwar | सत्ता आली की वचन विसरलात?; सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू...
Pandharpur Wari Chori News | पालखी सोहळ्यात चोरट्यांचा सुळसुळाट! खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू अनावर
सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
Beed kej Morcha | विलास घुले हत्या प्रकरण पेटलं! सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात काय घडतंय?
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात मोठं काय घडतंय? चर्चांना वेग
नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील... ठाकरे गटाची मोठी पोलखोल
Nashik Thackeray Nagarsevak | नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील त्यांना... ठाकरे गटाची पत्रकार परिषदेत मोठी पोलखोल