AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराण युद्धामुळे समुद्रातील इंटरनेट केबल्सना धोका ?, भारतासाठी मोठा अलर्ट

मध्य पूर्वेत अमेरिका- इस्राईल आणि इराणच्या दरम्यान वाढलेल्या तणावाने समुद्राच्या खाली अंथरलेल्या केबल्सना देखील धोका निर्माण झाला आहे. जगाचे ९९ टक्के इंटरनेटचे ट्रॅफीक याच केबल्समध्ये ट्रान्सफर होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

इराण युद्धामुळे समुद्रातील इंटरनेट केबल्सना धोका ?, भारतासाठी मोठा अलर्ट
UNDER SEA CABLE
| Updated on: Apr 02, 2026 | 5:46 PM
Share

इराणच्या युद्धाला आता जवळपास एक महिना उलटला आहे. अमेरिकेने इराणमध्ये सैन्य घुसवण्याची धमकी दिली असून या युद्धाचा शेवट जवळ आला असल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. आता या युद्धाचा परिणाम जमीन आणि आकाशापुरता मर्यादित न राहाता समुद्राच्या तळाशी पोहचला आहे. जगातील बहुतांशी भागातील इंटरनेट नेटवर्क सांभाळणाऱ्या अंडरसी फायबर- ऑप्टीक केबल्स आता धोक्यात आल्या आहेत. त्यामुळे जगभरातील इंटरनेटचे नेटवर्क धोक्यात आले आहे.

संवेदनशील भागातून जाताहेत केबल्स

इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन यूनियन म्हणजे ITU च्या मते ग्लोबल इंटरनेट टॅफीकचा सुमारे 99 टक्के हिस्सा समुद्राच्या खालून अंथरलेल्या केबल्सद्वारे एका जागेहून दुसऱ्या जागी ट्रान्स्फर होत आहे. या केबल्स स्ट्रेट ऑफ होर्मुझ आणि रेड सी सारख्या संवेदनशील भागातून जात आहेत. जेथील परिस्थिती सध्या अत्यंत तणावग्रस्त आहे.

 इन्फ्रास्ट्रक्चरला धोका

वास्तविक या केबल्स संदर्भात इराणच्या वतीने सध्या तरी कोणतीही धमकी देण्यात आलेली नाही. परंतू इराण समर्थित हुती बंडखोरांनी अनेक वेळा या केबल कापण्याच्या धमक्या दिल्या आहेत. अशाच या खास इन्फ्रास्ट्रक्चरला धोका निर्माण झाला आहे.

भारतासाठी मोठा अलर्ट

भारतासाठी ही स्थिती आणखीनच चिंताजनक होऊ शकते. कारण देशातील सुमारे ६० टक्के इंटरनेट ट्रॅफीक मुंबईतून युरोपला जाणाऱ्या समुद्री मार्गावर अवलंबून आहे, जे या संवेदनशील भागातून जात आहे.

तर उर्वरित ट्रॅफीक चेन्नई ते सिंगापूर आणि प्रशांत महासागरातून जाते. याचा अर्थ भारताची इंटरनेट कनेक्टीव्हिटीचा मोठा हिस्सा आता जिओपॉलिटीकल जोखीमेच्या घेऱ्यात आहे.

लाल समुद्रातून जातात १७ अंडरसी केबल्स

लाल समुद्रातून सुमारे १७ अंडरसी केबल्स जात असून या केबल्समध्ये फायबर ऑप्टीक कोअर, कॉपर वायरिंग आणि प्रोटेक्टिव्ह लेअर्स असतात. ज्याद्वारे प्रत्येक सेंकदास हेव्ही डेटा ट्रान्सफर होत असतो.

स्लो होणार इंटरनेट?

जर इराण युद्धात कोणत्याही कारणाने या केबल्सना नुकसान पोहचले तर इंटरनेट संपूर्णपणे बंद पडणार नाही. कारण नेटवर्क अनेक मार्गांनी जोडलेले आहे., परंतू ट्रॅफीक अन्यत्र वळवण्याने नेटवर्कवर दबाव वाढू शकतो. त्यामुळे भारतातील इंटरनेट स्लो होऊ शकते असे म्हटले जात आहे.

Follow Us
वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा
मोठी बातमी! वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा आक्रोश
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण! "काका मला मारू नका, मी...
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण!
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा Video समोर
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिय
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिया सुळेंनी पक्षातील Inside Story सांगितलीच
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले..
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले...
थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
मोठी बातमी! थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार; उपमुख्यमंत्री शिंदेंचे विधान
राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
Bachchu Kadu | राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर
Pandharpur Wari | टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर दिवेघाट सर करत वारी चालली पंढरी
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं,
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं, कोण आहे पवार कुटुंबातील होणारी सून?