युक्रेनची अवस्था बघून भारत मदतीला धावला, रशियाला दिला सबुरीचा सल्ला…

| Updated on: Oct 10, 2022 | 9:27 PM

रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशाना भारताकडून सांगण्यात आले आहे की, शांतता प्रस्थापित करण्यासाठी आम्ही कोणत्याही प्रकारची तुम्हाला मदत करु.

युक्रेनची अवस्था बघून भारत मदतीला धावला, रशियाला दिला सबुरीचा सल्ला...
Follow us on

नवी दिल्लीः युक्रेनवर रशियाने (Ukraine Russia) हल्ल्या सुरू केल्याने आणि प्रचंड नुकसान होत असल्याने आता भारताने चिंता व्यक्त केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाकडून यासंदर्भात निवेदन जाहीर करण्यात आले असून युक्रेनमध्ये वाढलेल्या तणावामुळे भारताने  चिंता व्यक्त केली असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाकडून (foreign ministry) सांगण्यात आले आहे. रशियाने केलेल्या हल्ल्यात (Attack) अनेक इमारती आणि पायाभूत सुविधांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या हल्ल्यात अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
.युद्धजन्य परिस्थितीत तणाव वाढणे हे कोणत्याही देशाच्या हिताचे नाही.

त्यामुळे आम्ही आवाहन करतो की तात्काळ संवादरुपाने आणि शांततेच्या मार्गाने तोडगा काढण्याचा सल्ला दिला आहे.

दोन्ही देशाना भारताकडून सांगण्यात आले आहे की, शांतता प्रस्थापित करण्यासाठी आम्ही कोणत्याही प्रकारची तुम्हाला मदत करण्यास तयार आहोत.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सोमवारी काही काळ शांतता प्रस्थापित झाल्यानंतर युक्रेनच्या काही भागातील झालेल्या नुकसानीबाबत प्रसार माध्यमांना दिलेल्या माहितीती त्यांनी ही माहिती दिली आहे.

यावेळी बागची म्हणाले की आम्ही सगळ्या बाजूंनी तुमच्यासोबत चर्चा करुन शत्रूत्व थांबवण्यासाठी आवाहन करत आहोत.

दोन्ही देशातील ही युद्ध जन्य परिस्थिती हातळण्यासाठी आणि जनजीवन सुरळीत करण्यासाठी तुम्हाला आम्ही मदत करण्याची तयारी करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

युक्रेनमधील संघर्षामुळे भारत चिंतेत असून अनेक नागरिकांचा मृत्यू झाला असल्याने भारताने चिंता व्यक्त केली आहे.

परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, संघर्ष सुरू झाल्यापासून, भारतानकडून संयुक्त राष्ट्रांच्या सनद, आंतरराष्ट्रीय कायदा आणि सर्व देशांचे सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेच्या तत्त्वांची पाठराखण केली आहे.

विशेष म्हणजे, रशियाने सोमवारी युक्रेनची राजधानी कीवसह अनेक शहरांवर हल्ले केले आणि नागरी भागावरही लक्ष्य केले. त्यामुळे कीवमध्ये आठ जणांपेक्षा अधिक जणांचा मृ्त्यू झाला आहे.

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी हल्ल्यानंतर सांगितले की, युक्रेनवरील हल्ले हे मॉस्को-नियंत्रित क्रिमियन द्वीपकल्पातील पुलावरील हल्ल्यासह कीवच्या दहशतवादी कारवायांच्या प्रत्युत्तरात केले गेले होते.

गेल्या महिन्यात समरकंद येथे झालेल्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या (एससीओ) बैठकीच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सांगितले होते की, आजचे युग हे युद्धाचे युग नाही आणि संवाद साधून तोडगा काढण्याचा पर्याय आहे. त्यामुळे तुम्ही हे युद्ध थांबवा असा सल्लाही त्यांना त्यावेळी देण्यात आला होता.