UNHRC मध्ये भारताचा पाकिस्तानच्या जिव्हारी लागणारा वार, त्यांना जेव्हा आपल्याच लोकांवर बॉम्ब…

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत (UNHRC) भारताने पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. पाकिस्तानच्या जिव्हारी लागणारा वार केला आहे. भारताविरुद्ध चिथावणीखोर आणि आधारहीन वक्तव्य करुन पाकिस्तान या मंचाचा दुरुपयोग करतोय असा आरोप भारताने केला.

UNHRC मध्ये भारताचा पाकिस्तानच्या जिव्हारी लागणारा वार, त्यांना जेव्हा आपल्याच लोकांवर बॉम्ब...
UNHRC
| Updated on: Sep 24, 2025 | 8:26 AM

भारताविरुद्ध चिथावणीखोर वक्तव्य केल्याच्या मुद्यावरुन भारताने मंगळवारी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत (UNHRC) पाकिस्तानला घेरलं. भारताने पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर दिलं. खैबर पख्तूनख्वामध्ये आपल्याच नागरिकांवर पाकिस्तानी सैन्याने केलेल्या हल्ल्याचा मुद्दा भारतीय राजनैतिक अधिकारी क्षितिज त्यागी यांनी उपस्थित केला. ते म्हणाले की, “पाकिस्तानला जेव्हा आपल्याच लोकांवर बॉम्ब वर्षाव करण्यापासून वेळ मिळेल तेव्हा ते वेंटिलेटरवर असलेली आपली अर्थव्यस्था वाचवण्यावर लक्ष देतील”

भारताविरुद्ध चिथावणीखोर आणि आधारहीन वक्तव्य करुन पाकिस्तान या मंचाचा दुरुपयोग करतोय असा आरोप भारताने पाकिस्तानवर केला. जेनेवा येथे प्रमानेंट मिशनचे काउंसलर क्षितिज त्यागी मानवाधिकार परिषदेच्या 60 व्या सत्रात भारताच प्रतिनिधीत्व करत होते. “पाकिस्तानने आपल्या लाइफ सपोर्टवर असलेल्या अर्थव्यवस्थेला वाचवावं. सैन्याच्या दबदब्याखाली दबलेलं राजकारण सुधारावं आणि मानवाधिकार रेकॉर्ड सुधारावा” असं क्षितिज त्यागी यांनी सुनावलं.

पाकिस्तानच्या जिव्हारी लागणारा टोमणा

काउंसलर त्यागी म्हणाले की, “आमच्या क्षेत्रावर लक्ष ठेवण्याऐवजी बेकायदरित्या ताब्यात घेतलेलं आमचं क्षेत्र खाली केलं, तर जास्त चांगलं होईल. अर्थव्यवस्था वाचवणं, सैन्याखाली दबलेलं राजकारण सुधारणं आणि छळवादाचा मानवाधिकार रेकॉर्ड सुधारण्यावर लक्ष द्यावं” “दहशतवाद पसरवणं, दहशतवाद्यांना आश्रय देणं आणि आपल्याच लोकांवर बॉम्बफेकीपासून वेळ मिळाला तर पाकिस्तानला हे सर्व करता येईल” असं क्षितिज त्यागी यांनी पाकिस्तानच्या जिव्हारी लागणारा टोमणा मारला.


एअर फोर्सची रात्रभर हवाई कारवाई

स्थानिक रिपोर्टनुसार, सोमवारी खैबर पख्तूनख्वामधील एका गावावर पाकिस्तानी एअर फोर्सने रात्रभर हवाई कारवाई केली. यात कमीत कमी 30 लोकांचा मृत्यू झाला. याच मुद्यावरुन भारताने पाकिस्तानला घेरलं. परिषदेने सर्वांसाठी समान, निष्पक्ष आणि पक्षपातरहीत भूमिका घेतली पाहिजे याचा त्यागी यांनी पुनरुच्चार केला. आपल्या सगळ्यांचा प्रयत्न एकजूट आणि चांगलं सहकार्य वाढवण्याचा असला पाहिजे. असं त्यागी म्हणाले.