India-US Trade Deal : ट्रेड डील करताना भारताने अमेरिकेला कुठला मोठा शब्द दिलाय? देशाची इकोनॉमी बदलणारे पॉइंट कुठले?

India-US Trade Deal : बऱ्याच महिन्यांपासून हो-नाय सुरु असलेली भारत-अमेरिकेमधील ट्रेड डील अखेर प्रत्यक्षात येत आहे. सध्या या कराराचा स्वरुप अंतरिम असेल. पण या करारासाठी भारताने अमेरिकेला एक मोठा शब्द दिलाय. एकूणच हा करार काय आहे ते समजून घ्या.

India-US Trade Deal : ट्रेड डील करताना भारताने अमेरिकेला कुठला मोठा शब्द दिलाय? देशाची इकोनॉमी बदलणारे पॉइंट कुठले?
India-US Trade Deal
| Updated on: Feb 07, 2026 | 10:52 AM

भारत आणि अमेरिकेने शुक्रवारी ऐतिहासिक व्यापार करारच्या दिशेने आणखी एक मजबूत पाऊल टाकलय. दोन्ही देशांनी अंतरिम ट्रे़ड डीलचं फ्रेमवर्क जाहीर केलय. या कराराचा उद्देश कर कमी करणं आणि आर्थिक सहकार्य दृढ बनवणं आहे. दोन्ही देश आपपाल्या जागतिक पुरवठ्याच्या साखळीच फेरनिर्माण आणि ती अधिक लवचिक बनवण्यावर काम करतायत. त्यावेळी भारत-अमेरिकेमध्ये हा करार होत आहे. भारत आणि ईयूमध्ये झालेल्या कराराला मदर ऑफ ऑल डील म्हटलं जात असताना भारत-अमेरिकेतील या कराराला फादर ऑफ ऑल डील म्हटलय.

ही डील जगातील सर्वात मोठी इकोनॉमी आणि जगातील सर्वात मोठ्या बाजारामध्ये झाली आहे. पुढच्या काही दिवसात अमेरिकी बाजाराची चावी भारताच्या हातात असेल. कॉम​र्स मिनिस्टर पीयूष गोयल यांनी कराराची काही महत्वाचे पॉइंट्स एक्सप्लेन केलेत. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था बदलू शकते.

भारत कुठल्या मुद्यांवर सहमत

भारत ज्या मुद्यांवर सहमत झालाय, त्यात अमेरिकी औद्योगिक उत्पादनांवरील टॅरिफ समाप्त करणं किंवा कमी करण आहे.

सूकं धान्य, पशू आहारासाठी लाल ज्वार, मेवा, फळं, सोयाबीन तेल, दारु आणि स्पिरिटसह अमेरिकी कृषी आणि खाद्य उत्पादनांच्या शुल्कावर कपात करण्यावर एकमत झालय.

अमेरिका कुठल्या मुद्यांवर सहमत

वस्त्र, चामडं, बूट, प्लास्टिक, रबर, जैविक रसायन, घरगुती सजावट, हस्तशिल्प उत्पादनं आणि काही मशीनरीसह अधिकांश भारतीय वस्तूंवर 18 टक्के रेसिप्रोकल टॅरिफ लागू होईल.

अंतरिम करार यशस्वीरित्या लागू झाल्यानंतर जेनेरिक फार्मास्यूटिकल्स, रत्न, हीरे आणि विमानाचे सुट्टे भागं सारखी क्षेत्र कवर करत भारतीय वस्तुंच्या एक वाइड चेनवरील रेसिप्रोकल टॅरिफ हटवण्यात येईल.

भारताने काय शब्द दिलाय?

भारताने पुढच्या पाचवर्षात 500 अब्ज डॉलर मुल्याचं अमेरिकी सामान विकत घेण्याचा शब्द दिला आहे. यात ऊर्जा उत्पादनं, विमानं आणि सुट्टे भाग, किंमती धातू, टेक्निकल उत्पादनं आणि कोकिंग कोळसा याचा समावेश आहे. ग्राफिक्स प्रोसेसिंग यूनिट (जीपीयू) आणि डेटा सेंटर उपकरणासह प्रौद्योगिकी व्यापार विस्तार सुद्धा या डीलचा उद्देश आहे. अंतरिम फ्रेमवर्क लवकरच लागू केलं जाईल. दोन्ही देश पूर्ण बीटीएच्या दिशेने चर्चा सुरु ठेवताना कराराला अंतिम स्वरुप देतील.