AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड, आणखी मोठी नावं समोर येणार?

पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड, आणखी मोठी नावं समोर येणार?

| Updated on: May 13, 2026 | 4:40 PM
Share

नीट पेपरफुटी प्रकरणाच्या तपासाला आता वेग आला असून, दररोज धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणात नाशिकमधून एका आरोपीला अटक केल्यानंतर तपासाचे धागेदोरे आता थेट अहिल्यानगरपर्यंत पोहोचले आहेत. केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून आणखी काही संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यांची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ताब्यात घेतलेल्या संशयितांची चौकशी अहिल्यानगर पोलीस अधीक्षक कार्यालयात सुरू आहे. याच प्रकरणात अटक करण्यात आलेल्या धनंजय लोखंडे याचीही कसून चौकशी केली जात आहे. 12 मेपासून मुंबईचे CBI पथक अहिल्यानगरमध्ये तळ ठोकून असून, संशयितांची पेपरफुटी प्रकरणातील भूमिका तपासली जात आहे.
या प्रकरणात सर्वप्रथम नाशिकमधून शुभम खैरनार याला अटक करण्यात आली होती. त्याच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीनंतरच CBI ने तपासाची दिशा बदलत अहिल्यानगरमध्ये कारवाई सुरू केली. दरम्यान, राहुरी तालुक्यातील 26 वर्षीय धनंजय लोखंडे याला अटक करण्यात आली असून, त्याला 12 मे रोजी CBI च्या ताब्यात देण्यात आले. अटक टाळण्यासाठी तो पुण्याहून अहिल्यानगरात गेला होता, मात्र पोलिसांनी त्याचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले.
तपासादरम्यान शुभम खैरनारचा संबंध मध्य प्रदेशातील सिहोर येथील एका विद्यापीठाशी असल्याची माहिती समोर आली आहे. त्याने 2021 मध्ये बीएएमएस अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला होता, मात्र प्रवेशानंतर तो नियमित उपस्थित राहत नसल्याचे विद्यापीठ प्रशासनाने सांगितले आहे. आता या प्रकरणात आणखी कोणती नावे समोर येतात आणि तपासातून कोणते नवे खुलासे होतात, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

Published on: May 13, 2026 04:40 PM
Follow Us