
भारत आणि श्रीलंकेमध्ये चांगली मैत्री आहे. भारत नेहमीच श्रीलंकेला मदत करत असतो. पण तरीही काहीवेळा श्रीलंकेला या चांगल्या मैत्रीचा विसर पडतो आणि ते भारतविरोधी कृती करतात. चीनच्या अति आहारी जाण्याचे परिणाम श्रीलंका भोगतच आहे. आता श्रीलंकन नौदलाने जाफनाच्या डेल्फ्ट समुद्रात 12 भारतीय मच्छीमारांना अटक केली. या मच्छी मारांवर आरोप आहे की, त्यांनी मासे पकडताना श्रीलंकेच्या समुद्री सीमेच उल्लंघन केलं. श्रीलंकन नौदलाने मच्छीमारांची नावही जप्त केली आहे. या करावाईचा दोन्ही देशांच्या संबंधांवर परिणाम होऊ शकतो.
“28 सप्टेंबर 2025 रोजी डेल्फ्ट बेटाजवळ श्रीलंकेच्या जलक्षेत्रात बेकायदरित्या मासेमारी करणारी भारतीय नाव जप्त केली आणि त्यातील 12 मच्छीमारांना अटक केली” असं श्रीलंकन नौदलाने म्हटलं आहे. मासेमारी करताना भारतीय मच्छीमार बेकायदरित्या श्रीलंकेच्या जलक्षेत्रात आले होते असं श्रीलंकन नौदलाच म्हणणं आहे.
भारताकडून स्टेटमेंट आलेलं नाही
भारतीय मच्छीमारांची जप्त केलेली ही नौका कंकसांथुरेई बंदरात आणण्यात आली आहे. पुढील कायदेशीर कारवाईसाठी मैालाडीच्या मत्स्य निरीक्षकाकडे सोपवण्यात आली आहे. भारताकडून अजून यावर कुठलही अधिकृत स्टेटमेंट आलेलं नाही.
नौका जप्त
भारत-श्रीलंका संबंधात मच्छीमारांचा विषय हा वादग्रस्त मुद्दा बनला आहे. श्रीलंकन नौदलाने पाक जलडमरु येथे भारतीय मच्छीमारांवर गोळीबार केला. श्रीलंकेच्या जलक्षेत्रात बेकायदरित्या प्रवेश केल्याच्या आरोपावरुन आतापर्यंत भारतीय मच्छीमारांच्या अनेक नौका जप्त करण्यात आल्या आहेत.
अटक केलेले मच्छीमार कुठले?
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, अटक केलेल्या मच्छीमारांपैकी दहा कराईकल जिल्ह्यातील आहेत. एक नागपट्टिनम आणि एक एक मयिलादुथुराईचा आहे. श्रीलंकन नौदलाचे जप्त केलेली नाव कराईकल जिल्ह्यातील कोट्टुचेरी मेदु गावातील 44 वर्षाच्या टी सेल्वम यांची आहे.
हे मच्छीमार गुरुवारी सकाळी कराईकल बंदरातून मासेमारी रवाना झाले होते. शनिवारी रात्री कोडियाकराईच्या (प्वाइंट कॅलिमेरे) दक्षिणेला अन्य नावांसोबत मिळून मासे पकडत होते. रविवारी सकाळी 2.40 च्या सुमारास श्रीलंकेच्या उत्तरी नौदलाच्या नौसैनिकांनी त्यांना अटक केली. त्यांची नाव जप्त केली.