इराणचा सर्वात मोठा मिसाईल हल्ला, 3 भारतीय जखमी, संपूर्ण जगात खळबळ; युद्धभूमीत भयंकर घडलं!
संपूर्ण जगाची झोप उडवणारी बातमी समोर आली आहे. इराण आणि अमेरिका यांच्यात पुन्हा एकदा युद्ध भडकण्याची शक्यता आहे. इराणने सीजफायर तोडल्याची माहिती समोर आली आहे. इराणने युएईवर हल्ला केला आहे.

संपूर्ण जगाची झोप उडवणारी बातमी समोर आली आहे. इराण आणि अमेरिका यांच्यात पुन्हा एकदा युद्ध भडकण्याची शक्यता आहे. इराणने सीजफायर तोडल्याची माहिती समोर आली आहे. इराणने युएईवर हल्ला केला आहे. फुजैराहमध्ये हा मिसईल हल्ला झाला आहे. यामुळे परिसरात आग लागली आहे. यामुळे युएईने आपली डिफेन्स सिस्टीम सक्रिय केली आहे. या हल्ल्यात 3 भारतीय जखमी झाले असल्याचीही माहिती समोर आली आहे.
फुजैराहमध्ये भीषण आग
इराण कडून झालेल्या ड्रोन हल्ल्यामुळे फुजैराह येथील पेट्रोलियम औद्योगिक परिसरात भीषण आग लागली. आग विझवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. फुजैराह हा त्या पाइपलाइनचा शेवटचा टोक आहे, ज्याचा वापर यूएईने इराण युद्धाच्या काळात होर्मुज सामुद्रधुनी मार्गे तेल पाठवणे टाळण्यासाठी केला होता. यूएईच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की त्यांची एअर डिफेन्स प्रणाली सध्या इराणकडून येणाऱ्या मिसाइल आणि ड्रोन हल्ल्यांना प्रत्युत्तर देत आहे.
तीन मिसाईल अडवल्या…
संरक्षण मंत्रालयाने X वर दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘देशाच्या विविध भागांत ऐकू येणारे आवाज हे एअर डिफेन्स प्रणालीकडून बॅलिस्टिक मिसाइल, क्रूझ मिसाइल आणि ड्रोन हल्ले अडवताना निर्माण होत आहेत.’ फुजैराह मीडिया कार्यालयानुसार, इराणच्या ड्रोन हल्ल्यानंतर अमिरातीतील पेट्रोलियम औद्योगिक क्षेत्रात मोठी आग लागली. ही घटना यूएईच्या संरक्षण मंत्रालयाने काही वेळापूर्वी चार मिसाइल डागण्यात आल्याची माहिती दिल्यानंतर घडली. मंत्रालयाच्या मते, इराणकडून चार मिसाइल डागण्यात आले, त्यापैकी तीन अडवण्यात यश आले, तर एक समुद्रात पडली.
युएईकडून अलर्ट जारी
या घटनेनंतर यूएईने नवीन मिसाइल अलर्ट जारी केला आहे. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने इशारा दिला आहे की त्यांची एअर डिफेन्स प्रणाली संभाव्य मिसाइल धोक्याला उत्तर देत आहे. याआधी दोन तासांपूर्वीही असाच इशारा देण्यात आला आहे. अशातच आता इराणने युद्धविराम तोडल्याचे समोर आले आहे, त्यामुळे आता मध्यपूर्वेत पुन्हा एकदा युद्ध पेटण्याची शक्यता आहे. आगामी काळात अमेरिकेकडून इराणवर हल्ले होण्याची शक्यता आहे.