AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

US-Iran : अमेरिका-इराणमध्ये परिस्थिती चिघळली, हॉर्मुजमध्ये मोठ्या प्रमाणावर गोळीबार, विमान पाडल्याचा दावा, आता पुढे काय?

US-Iran Update : भारतासह जगाची चिंता वाढवणारी बातमी आहे.अमेरिका-इराणमध्ये एका बाजूला शांतता कराराच्या वाटाघाटी सकारात्मक पद्धतीने पुढे जात असल्याच्या बातम्या येत आहेत. पण दुसऱ्याबाजूला दोन्ही देशांकडून परस्परांवर हल्ले देखील सुरु आहेत. त्यामुळे अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

US-Iran : अमेरिका-इराणमध्ये परिस्थिती चिघळली, हॉर्मुजमध्ये मोठ्या प्रमाणावर गोळीबार, विमान पाडल्याचा दावा, आता पुढे काय?
US-Iran
| Updated on: May 29, 2026 | 8:06 AM
Share

अमेरिका-इराणमध्ये एकाबाजूला शांतता वाटाघाटी सुरु असल्यातरी दुसऱ्याबाजूला परस्परांवर हल्ले देखील सुरु आहेत. काल अमेरिकेने इराणच्या अब्बास बंदरावर हल्ले केले होते. त्यानंतर इराणने कुवेतमधील अमेरिकेच्या बेसवर हल्ला करुन बदला घेतला. असे हल्ले सुरु असले तरी अमेरिकेकडून युद्धविराम कायम असल्याचं सांगण्यात येत आहे. पण या घडामोडींमुळे आखातामध्ये पुन्हा तणाव निर्माण होत चालला आहे. शुक्रवारी इराणचा किनारपट्टीवरील प्रांत बुशहर आणि स्ट्रेट ऑफ हॉर्मुजमध्ये स्फोटाचे आवाज ऐकू आले. बुशहर प्रांतात इराणच्या एअर डिफेन्स सिस्टिमने अमेरिकी सैन्याचं विमान पाडल्याचा दावा इराणी मीडियाने केला आहे. अमेरिकेने इराणचे हे दावे फेटाळून लावले आहेत.

इराणी वृत्तसंस्था तस्नीमनुसार शुक्रवारी बुशहर प्रांताच्या आकाशात अचानक मिसाइल्स दिसली. स्फोटाचे आवाज ऐकू आले. “आज रात्री इराणी एअर डिफेन्स सिस्टिमने शत्रुचं फायटर जेट इंटरसेप्ट करुन पाडलं” इराणच्या सरकारी वाहिनीने जाम काउंटीचे गवर्नर मसूद तंगेस्तानी यांच्या हवाल्याने हा दावा केला आहे.

समुद्रात मोठ्या प्रमाणावर गोळीबार

इराणी सैन्याने देशाच्या दक्षिण भागातून अनेक मिसाइल्स लॉन्च केली असं ‘फार्स’ न्यूज एजन्सीने वृत्त दिलं. स्ट्रेट ऑफ हॉर्मुजमध्ये जहाजांना इशारा देण्यासाठी समुद्रात मोठ्या प्रमाणावर गोळीबार करण्यात आला असं ‘तस्नीम’ एजन्सीने वृत्त दिलं आहे. त्यामुळे हॉर्मुजमध्ये तणावाच वातावरण आहे. हा गोळीबार करण्याच्या काहीतास आधी इराणच्या रिवोल्यूशनरी गार्ड्सने (IRGC) हॉर्मुज जवळ चार व्यापारी जहाजांना लक्ष्य केलं होतं. यात काही जहाजं ही अमेरिकेशी संबंधित असल्याचं सांगण्यात येत आहे.

परिस्थिती चिघळत चालली

यात हैराण करणारी बाब म्हणजे दोन्ही देशांमध्ये 60 दिवसांसाठी युद्धविराम आणि स्ट्रेट ऑफ हॉर्मुज उघडण्यासाठी शांती करारावर एकमत होत असल्याच्या बातम्या येत असताना हे हल्ले होत आहेत. कूटनितीमध्ये शांती प्रस्तावाची तयारी सुरु असताना दुसरीकडे दोन्ही देशांमध्ये परिस्थिती चिघळत चालली आहे.

नव्या निर्बंधांची घोषणा

गुरुवारीच अमेरिकेने इराणच्या तेल व्यापारावर नव्या निर्बंधांची घोषणा केली. इराणी कच्चं तेल आणि पेट्रोलियम उत्पादनांची वाहतूक करणाऱ्या आठ जहाजांना अमेरिकेच्या ट्रेजरी विभागाने ब्लॅकलिस्ट केलं आहे. यात मार्शल आयलँड्स, कोमोरोस आणि पनामामधील रजिस्टर झालेले टँकर आहेत. इराणला तेलाच्या माध्यमातून उत्पन्न मिळू नये, जेणेकरुन त्यांची सैन्य ताकद वाढणार नाही असं अमेरिकेचे ट्रेजरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट म्हणाले.

Follow Us
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील...
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील गरबा उत्सवात रंगत!
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका...
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका बदलली? आता भारतात...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल महोत्सवाने किल्ला उजळला
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल