AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगात पुन्हा हाहा:कार… अमेरिकेला ती चूक पडणार भारी; संतप्त इराणचेही एका क्षणात दणादण हल्ले

इराणच्या अब्बास बंदराजवळील हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून, इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने (आयआरजीसी) परिसरातील एका अमेरिकी लष्करी हवाई तळाला लक्ष्य करून एक जोरदार प्रतिहल्ला केल्याचा दावा केला आहे.

जगात पुन्हा हाहा:कार... अमेरिकेला ती चूक पडणार भारी; संतप्त इराणचेही एका क्षणात दणादण हल्ले
इराणचं अमेरिकेला चोख प्रत्युत्तर
| Updated on: May 28, 2026 | 9:55 AM
Share

अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेली शांतता चर्चा सध्या अयशस्वी होताना दिसत आहे. एकीकडे अमेरिकी सैन्याने अब्बास बंदरात असलेल्या इराणच्या एका ग्राऊंड स्टेशनवर सुद्धा हल्ला केल्याने खळबळ माजली. मात्र यामुळे इराण खवळला. अब्बास बंदराजवळील हल्ल्यांना इराणने चोख प्रत्युत्तर दिलं आहे. त्या हल्ल्याचा बदला म्हणून अमेरिकेच्या हवाई तळाला लक्ष्य करून हल्ला केल्याचा दावा इराणच्या आयआरजीसीने केला आहे. त्याचवेळी, कुवेतच्या संरक्षण मंत्रालयाने एक निवेदन जारी करून देशाच्या दिशेने डागलेली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन रोखत असल्याचे म्हटले .

तसनीम वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक वेळेनुसार पहाटे 4:50 वाजता अब्बास बंदराजवळ अमेरिकेने केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून त्यांनी एका अमेरिकन हवाई तळाला लक्ष्य केलंय, असं इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने गुरुवारी सांगितलं. मात्र आयआरजीसीने नेमका कोणता अमेरिकन तळ लक्ष्य केला, हे अजून स्पष्ट झालेलं नाही.

IRGCचा अमेरिकेला इशारा

तीन दिवसांत अमेरिकेने इराणवर 2 हल्ले केल्यानंतर इराण चांगलाच भडकला आहे. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने अमेरिकेला थेट, मोठा कडक इशारा दिला. असे हल्ले पुन्हा झाल्यास, इराण आणखी निर्णायक आणि प्राणघातक प्रत्युत्तर देईल. आणि त्याचे जे गंभीर परिणाम होतील, त्याला केवळ हल्ला करणाराच जबाबदार असेल असं त्यांनी डायरेक्ट स्पष्ट केलं.

या भीषण तोफगोळ्यांच्या हल्ल्याचा परिणाम आता शेजारील देशांवरही स्पष्ट दिसून येतोय. या प्रदेशातील धोक्यांमध्ये अचानक वाढ झाली असून, आता कुवैतने अधिकृतपणे घोषणा केली की ते आपल्या हवाई हद्दीत डागलेली क्षेपणास्त्रे आणि यूएवी(UAVs) सातत्याने रोखत आणि नष्ट करत आहे, असं त्यांनी जाहीर केलं.

अब्बास बंदराजवळ धमाके

यापूर्वी बुधवारी रात्री अमेरिकेने इराणमध्ये आणखी एक मोठा हवाई हल्ला केला. मिळालेल्या माहितीनुसार, इराणच्या बंदर अब्बास शहराच्या पूर्व भागात पहाटे सुमारे (स्थानिक वेळेनुसार) 1.30 वाजता तीन स्फोटांचे आवाज ऐकू आले.

अमेरिकेच्या लष्कराने रात्री इराणमध्ये नवीन हल्ले केले. होर्मुझच्या सामुद्रधुनीतील अमेरिकेच्या लष्करी आणि व्यावसायिक सागरी वाहतुकीला धोका निर्माण करणाऱ्या, एका लष्करी तळाला लक्ष्य करण्यात आले, अशी माहिती एका अमेरिकी अधिकाऱ्याने रॉयटर्सला दिली. ही कारवाई आत्मसंरक्षणासाठी करण्यात आल्याचे अमेरिकेतर्फे सांगण्यात आलंय.

Follow Us
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील...
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील गरबा उत्सवात रंगत!
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका...
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका बदलली? आता भारतात...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल महोत्सवाने किल्ला उजळला