AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बड्या नेत्याकडून एकनाथ शिंदे यांचा गेम, थेट महाविकास आघाडीला पाठिंबा; मोठी खदखद?

पदवीधर निवडणुकीत एकनाथ शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिल्याने मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. शिंदे गटासाठी हा धक्का मानला जात असून, यामुळे महायुतीतील अंतर्गत धुसफूस उघड झाली आहे.

बड्या नेत्याकडून एकनाथ शिंदे यांचा गेम, थेट महाविकास आघाडीला पाठिंबा; मोठी खदखद?
Eknath ShindeImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 17, 2026 | 3:41 PM
Share

राज्यात पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा धुरळा सुरू आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीनेही आपआपल्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी मोठी रणनीती आखली आहे. उमेदवारांनीही निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडवून दिला आहे. काही ठिकाणी छुपे पाठिंबे मिळवण्याचा प्रयत्नही होत आहे. पण छत्रपती संभाजीनगरमध्ये भलतंच समीकरण होताना दिसत आहे. थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे एकदम खास असणारे आणि शिवसेनेचे माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सत्तार यांचा हा निर्णय एकनाथ शिंदे यांच्यासाठी धक्का असल्याचं मानलं जात आहे.

शिंदे शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार प्रतापसिंह पाटील यांच्यासाठी अब्दुल सत्तार यांनी सभा घेतली. पदवीधर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सतीश चव्हाण यांना डावलून सत्तार यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार केल्याने महायुतीला आणि पर्यायाने एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे.

दरम्यान, महायुतीत कोणताही वाद नाही, असं राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं. सर्व वाद मिटल्याचा दावा त्यांनी केला होता. त्यानंतर अब्दुल सत्तार यांनी थेट शरद पवारांच्या उमेदवाराच्या स्टेजवर जाऊन शिंदे यांना धक्का दिला आहे. यामुळे महायुतीत अलबेल नसल्याचं उघड झालं आहे.

ठाकरेंनाही धक्का

प्रचार सभेला ठाकरे शिवसेनेचे आमदार राहुल पाटील यांची उपस्थिती होती. धक्कादायक म्हणजे दिलीप घुगे हे ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत. पण आमदार राहुल पाटील यांनी पवारांच्या उमेदवाराच्या सभेला हजेरी लावून उद्धव ठाकरे यांना झटका दिल्याचं बोललं जात आहे.

त्यांच्याशी चर्चा केली नाही

दरम्यान, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एखाद्या नेत्याने वैयक्तिक पााठिंबा दिला असेल. आम्ही काही त्यांच्याशी चर्चा केली नव्हती. परंतु प्रतापसिंह पाटील विजयी व्हावं, असं त्यांना वाटत असावं. समोरच्या उमेदवाराविषयी नाराजीचा सूर पक्षांमध्ये आणि मतदारांमध्ये आहे. त्यामुळेच सत्तार यांनी वेगळा निर्णय घेतला असेल, असं शशिकांत शिंदे म्हणाले.

शिंदे गटातील नेते नाराज आहेत का? असा सवाल शिंदे यांना करण्यात आला. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देशात राज्यात आणि केंद्रात तुम्ही भाजपचा इतिहास बघितला असेल तर जेवढे पक्ष त्यांच्या मदतीला आले, तेवढे पक्ष त्यांनी हळूहळू संपविले. आता सुद्धा या राज्यामध्ये त्यांचे दोन मित्र पक्ष आहेत. त्या पक्षांना 2029 पर्यंत हळूहळू संपविण्याचा प्रयत्न होईल. जिथे जिथे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील, सहकार क्षेत्रातील निवडणुका असतील, तिथे तिथे मित्र पक्षांचं असलेलं अस्तित्व संपविण्याचा प्रयत्न भाजप करत असतो, अशी मानसिकता त्यांच्या मित्र पक्षांमध्ये झाली असावी. त्यामुळे हा नाराजीचा सूर असावा, असं शिंदे यांनी सांगितलं.

Follow Us
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील...
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील गरबा उत्सवात रंगत!
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका...
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका बदलली? आता भारतात...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल महोत्सवाने किल्ला उजळला