
इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल युद्ध दिवसेंदिवस भयावह होत चाललं आहे. अमेरिका आणि इराण दोन्ही बाजूने परस्परांवर जोरदार हल्ले सुरु आहेत. या दरम्यान इराणच्या इस्लामिक रिवोल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने (IRGC) एक मोठा दावा केलाय. मिसाइल आणि ड्रोन हल्ल्यात आम्ही अमेरिकेची विमानवाहू युद्धनौका अब्राहम लिंकनचं नुकसान केलय असा दावा IRGC ने केलाय. इराणच्या या दाव्यावर अजूनपर्यंत अमेरिका काही बोललेली नाही. IRGC ने शुक्रवारी एक स्टेटमेंट जारी केलं. ऑपरेशन दरम्यान अमेरिकन नौदलाच्या विमानवाहू युद्ध नौकेला लक्ष्य केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. अब्राहम लिंकनचं किती नुकसान झालय किंवा किती जिवीतहानी झालीय या बद्दल कुठलीही माहिती दिलेली नाही. हल्ल्यात अब्राहम लिंकनचं नुकसान झालय एवढच म्हटलय. आता अमेरिकेच्या स्टेटमेंट नंतरच पुढचं चित्र स्पष्ट होईल.
इराणच्या या दाव्यावर अजून अमेरिकेची प्रतिक्रिया आलेली नाही. अमेरिका इराणच्या या दाव्यावर काय बोलणार? ते लवकरच कळेल. दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरु होऊन आता 15 दिवस होत आलेत. हे युद्ध संपण्याऐवजी आता अजून भीषण बनत चाललं आहे.
हा चालता-फिरता अमेरिकेचा किल्ला
यूएसएस अब्राहम लिंकन ही अणूऊर्जेवर चालणारी Nimitz-class aircraft carrier आहे. प्रामुख्याने मध्य पूर्वेत आणि इंडो-पॅसिफिक क्षेत्रात अमेरिकी सैन्य मोहिमासाठी या जहाजाची तैनाती केली जाते. हा चालता-फिरता अमेरिकेचा किल्ला मानला जातो.
कशी आहे अब्राहम लिंकन?
USS अब्राहम लिंकन अमेरिकेची सर्वात शक्तीशाली युद्धनौका आहे. त्याचं वजन 1,00,000 टन पेक्षा जास्त आहे. त्याची लांबी 1100 फूट आहे. म्हणूनच या युद्धनौकेला चालता फिरता किल्ला म्हटलं जातं. याची सुरक्षा क्षमता अभेद्य आहे. अमेरिकेने इराणवरील हल्ल्याची सुरुवात याच युद्धनौकेवरुन केली होती. हे जहाज एअर ऑपरेशन्ससाठी मेन कमांड सेंटर आणि लॉन्च प्लॅटफॉर्म म्हणून काम करतं. मिडिया रिपोर्ट्नुसार USS अब्राहम लिंकनच्या ताफ्यात 5700 ते 6000 अमेरिकी नौसैनिक आहेत. USS अब्राहम लिंकन वर अमेरिकेची सर्वात घातक फायटर जेट्स F-22, F-35 तैनात आहेत.