
इराण आणि अमेरिकेतील संघर्ष कमी होत नाहीये. थेट मोठे हल्ले केले जात आहेत. यादरम्यानच आता इराणकडून अत्यंत मोठी धमकी अमेरिकेला देण्यात आली. आम्ही आमचे रक्त देऊ पण जमीन अजिबातच नाही म्हणजे इराणकडून करो या मरोच्या लढाईचा इशारा देण्यात आला. विशेष म्हणजे या युद्धात कुठेतरी अमेरिका मागे पडताना दिसत आहे. अमेरिका आणि इस्त्रायलने अशा युद्धाचा विचारही केला नाही. इराणकडून मोठे हल्ले केले जात आहेत. इराणच्या सर्वोच्च नेत्याचे भारतातील प्रतिनिधी अब्दुल माजिद हकीम इलाही यांनी ANI सोबत बोलताना अमेरिकेसोबतच्या युद्धाबाबत म्हटले की, आज इराणी लोकांमध्ये एक राग दिसत आहे. आज लोक स्वत: म्हणत आहेत की, आम्ही देशासाठी बलिदान देण्यास तयार आहोत. ते स्पष्ट म्हणत आहे की, आम्ही रक्त देऊ पण जमिन नाही.
मुळात म्हणजे हे युद्ध नक्की किती दिवस चालेल हे सांगणे कठीण आहे. इराणने शेवटपर्यंत लढण्याचा निर्णय घेतला आहे. हे युद्ध कितीही वर्ष चालले तरीही चालेल, इराणला मोठ्या युद्धाचा अनुभव आहे. यापूर्वी इराण आणि इराकमध्ये तब्बल आठ वर्ष युद्ध सुरू होते इराणने खूप काही सहन केले.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेला दावा खोटा आहे. तेहरानकडून कोणत्याचे चर्चेचा प्रस्ताव अमेरिकेकडे ठेवण्यात आला नाही. पुढे त्यांनी म्हटले की, इराणला कोणत्याही चर्चेची अजिबात इच्छा नाही. कारण हे युद्ध अमेरिकेने केलेल्या कारवाईनंतर सुरू झाले. आम्ही या युद्धात अजिबातच झुकणार नसल्याचेही त्यांनी यादरम्यान बोलताना म्हटले. इराणला अगोदरपासूनच युद्ध नको होते.
आम्ही शेजारी देशांना विनंती केली होती की, युद्ध नको आपण चर्चा करू, पण ठीक आहे त्यांना युद्धच हवे होते तर युद्ध. इराणला इतरांना संकटात टाकून आनंद मिळत नाही पण स्वतंत्रता आणि सुरक्षा ठेवण्याकरिता त्यांची मजबूरी आहे. युद्ध सुरू झाल्यानंतर अमेरिकेकडून सांगण्यात आले होते की, युद्ध चार आठवडे सुरू राहिल. मात्र, सध्याची स्थिती बघता युद्ध काही महिने सुरू राहण्याचे मोठे संकेत आहेत.