आमच्या जमिनीवर पाऊल ठेवले तर पाय कापू, जगावर संकट, इराणच्या धमकीने हाहाकार..
इराण आणि अमेरिका युद्धाचे परिणाम संपूर्ण जगाला मोजावी लागतात. त्यातच आता धक्कादायक माहिती पुढे येतंय. इराण आणि अमेरिका युद्ध शांत झाल्याचे वाटले असताच आता पुन्हा जगाची झोप उडवणारी धमकी देण्यात आली.

इराण आणि अमेरिका यांच्यात गेल्या तीन महिन्यांपेक्षा अधिक काळावधीपासून तणाव बघायला मिळाला. अमेरिकेने इराणवर मोठे हल्ले केले. यावेळी होर्मुज खाडी बंद होती. या युद्धाचा परिणाम दोन तीन देशांपुरता मर्यादित राहिला नाही. या युद्धाचा फटका जगातील अनेक देशांना बसला. इराण आणि अमेरिका युद्धाच्या पार्श्वूमीवर आता जगाची झोप उडवणारा इशारा इराणने दिला. इराणी लष्कराने वॉशिंग्टनला कडक इशारा दिला आहे. इराणी लष्कराच्या भूदल विभागाचे कमांडर ब्रिगेडियर जनरल अली जहानशाही यांनी असा इशारा दिला की, अमेरिकाही तणावात आली. त्यांनी स्पष्ट केले की, इराणी भूमीवर पाऊल टाकणाऱ्या कोणत्याही परदेशी लष्करी दलाला ताबडतोब आणि कठोर उत्तर देण्यास आम्ही सज्ज आहोत. इराणमध्ये प्रवेश करणाऱ्याला रोखले जाईल.
इराणी सरकारी मीडियाच्या वृत्तानुसार, अली जहानशाही यांनी परकीय लष्करी घुसखोरीवर मोठा इशारा दिला. त्यांनी स्पष्ट केले की, इराणी धरतीवर कोणत्याही परकीय लष्कराच्या जवानांची घुसखोरी सहन केली जाणार नाही. जर अमेरिकेच्या लष्करातील कोणत्याही जवानाने इराणमध्ये पाऊल ठेवले तर त्याचा आम्ही खात्मा करू. कोणताही कारवाईसाठी इराण सज्ज आहे.
शत्रूच्या कोणत्याही कृतीला आम्ही कठोर आणि धक्कादायक प्रत्युत्तर देऊ. आमच्या जमिनीवर पाऊल ठेवले तर आम्ही पाय कापू असेही यादरम्यान त्यांनी म्हटले. इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष कुठे ना कुठे कमी होताना दिसत असतानाच आता इराणकडून जगाची झोप उडवणारी धमकी देण्यात आली. दुसरीकडे अमेरिकेने मोठा निर्णय घेतला असून देशातील शस्त्र उत्पादन वाढवले आहे.
तश्या सूचना त्यांनी प्रत्येक विभागाला दिल्या आहेत. अमेरिकेच्या मनात नक्की काय सुरू आहे, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. अमेरिकेचा इराणसोबतच्या युद्धात शस्त्रसाठा कमालीचा कमी झाला. त्यातच त्यांनी आता धक्कादायक निर्णय घेतला. अमेरिका आणि इराण यांच्या युद्धाचा फटका फक्त त्या दोन देशांपुरता मर्यादित अजिबात राहत नाही. याचा फटका अख्ख्या देशाला बसतो. कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसली.