AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगावर मोठं संकट! ज्याची भीती होती तोच निर्णय अमेरिकेकडून, थेट काढले पत्रच..

इराण आणि अमेरिका यांच्या युद्धामुळे जग वैतागले होते. त्यामध्येच आता मोठी माहिती पुढे येतंय. अमेरिकेने धक्कादायक निर्णय घेतला. तश्या सूचना त्यांनी त्यांच्या विभागांना दिल्या आहेत. ज्यामुळे जगात खळबळ उडाली.

जगावर मोठं संकट! ज्याची भीती होती तोच निर्णय अमेरिकेकडून, थेट काढले पत्रच..
Donald Trump
| Updated on: Aug 10, 2026 | 6:49 AM
Share

इराण आणि अमेरिका यांच्यात मोठा संघर्ष बघायला मिळाला. आता अमेरिकेने इराणवरील हल्ले थांबवले आहेत. मात्र, यादरम्यानच मोठी माहिती पुढे येत आहे, ज्यामुळे सर्व जगानेच धसका घेतला. अमेरिकेने आपल्या शस्त्र उत्पादनात मोठी वाढ केली. इराणसोबत सुरू असलेल्या युद्धात 5 महिने मोठे क्षेपणास्त्र अमेरिकेने इराणवर टाकली. आता त्यांनी आपले शस्त्र उत्पादन वाढवले आहे. अमोरिकेने अचानक शस्त्र उत्पादन वाढवल्याने विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत. अमेरिकेचा काहीतरी मोठे करण्याचा डाव असल्याचे बोलले जाते. पेंटागनचे प्रवक्ते सीन पार्सेन यांनी शस्त्रे मोठ्या प्रमाणात खरेदी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ज्यावेळी धोका निर्माण होईल, त्यावेळी शस्त्र कमी नसून नयेत, याकरिता त्यांनी हा निर्णय घेतल्याचे कळतंय.

उपसंरक्षणमंत्री स्टीव फीनबर्ग यांनी नुकताच संरक्षण कंपन्यांना पत्र पाठवले आहे. 21 दिवसांमध्ये आपली योजना पाठवण्याबद्दल त्या पत्रात म्हटले आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये उत्पादन वाढले पाहिजे, असे त्या पत्रात म्हटले आहे. इराणच्या पाच महिन्याच्या युद्धात अमेरिकेचा शस्त्रसाठा कमी झाल्याने शस्त्र उत्पादन अमेरिकेने वाढवल्याच बोलले जातंय.

अमेरिकेच्या सैन्यातील मिसाईल कमी झाल्याचे सांगितले जातंय. इराणसोबतच्या युद्धात अमेरिकेने आक्रमक भूमिका घेतली. मोठे हल्ले इराणवर करण्यात आली. होर्मुज खाडीत अमेरिकेचे सैन्य काही दिवस होते. यादरम्यान इराणच्या दिशेने जाणाऱ्या जहाजांना टार्गेट करून हल्ला करण्यात आला. इतके मोठे हल्ले होत असतानाही इराण मागे हटताना दिसले नाही.

इराणवर प्रचंड मोठी हल्ले अमेरिकेने केली. होर्मुज खाडी युद्धाचे मैदान बनली होती. अमेरिकेने केलेल्या हल्ल्यानंतर इराणकडून होर्मुज खाडी बंद करण्यात आली. होर्मुज खाडी बंद असल्याने मोठे संकट कच्च्या तेलाचे भारतासह अन्य देशांमध्ये होते. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती प्रचंड वाढताना दिसल्या. त्यातच अमेरिकेने शस्त्र उत्पादन वाढवण्यावर भर दिला. अमेरिकेकडून भारत आणि चीन यांच्यासह अन्य तीन देशांवर 100 टक्के टॅरिफ लावण्याची तयारी करण्यात आली. हा भारतासाठी मोठा धक्का आहे. भारताने यावर अजून काही प्रतिक्रिया दिली नाही.

Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा