भाई आता माघार नाही, डोक्याच्या बदल्यात डोकेच, ट्रम्प यांच्या शांततेच्या घोषणेनंतर इराणचा खळबळजनक इशारा, थेट..

अमेरिका आणि इराण युद्धाबाबत अनेक घडामोडी घडत आहे. अमेरिकेने दिलेल्या धमकीनंतर इराणकडून थेट होर्मुज खाडी पूर्णपणे बंद करणार असल्याची धमकी दिली. अमेरिका इराणवर मोठा हल्ला करणार असल्याचे सांगितले जात असतानाच थेट पाच दिवसांकरिता युद्ध अमेरिकेकडून बंद करण्यात आले.

भाई आता माघार नाही, डोक्याच्या बदल्यात डोकेच, ट्रम्प यांच्या शांततेच्या घोषणेनंतर इराणचा खळबळजनक इशारा, थेट..
Iran's military advisor Mohsen Rezaei
| Updated on: Mar 24, 2026 | 8:05 AM

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल मोठी घोषणा केली. डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या घोषणेनंतर जगाने सुटकेचा निश्वास घेतला. मात्र, इराणला फक्त हेच हवे नाही तर इराणकडून स्पष्ट करण्यात आले की, जर तुम्हाला हे युद्ध थांबवायचे असेल तर एक करार करावा लागेल. डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढील पाच दिवसांकरिता युद्ध थांबवण्याचा निर्णय घेतला. डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणेनंतर इराणकडून एक निवेदन जारी करण्यात आले. इराणचे लष्करी सल्लागार मोहसेन रझाई यांनी स्पष्टपणे सांगितले की, जोपर्यंत त्यांच्या सर्व अटींची पूर्तता होत नाही तोपर्यंत युद्ध सुरूच राहील. कोणत्याही परिस्थितीमध्ये इराण या युद्धातून माघार घेणार नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी इतकी मोठी घोषणा केल्यानंतर इराणही आपली भूमिका बदलेल असा अंदाज होता, पण इराण काही मागे हटताना दिसत नाही. इराणकडून थेट धमकी दिली जात आहे. हेच नाही तर इराण अमेरिकेसोबत चर्चेकरिताही राजी नाही, अमेरिकेसोबत 24 दिवसांच्या थैमानानंतर आम्ही कोणतीही चर्चा करणार नसल्याचे इराणने म्हटले.

यादरम्यानच रेझाई यांनी म्हटले की, या युद्धादरम्यान झालेल्या आमच्या नुकसानाची भरपाई आम्हाला हवी आहे. सर्व आर्थिक निर्बंधही हटवले जावेत. हेच नाही तर यापुढे अमेरिका आमच्या अंतर्गत बाबींंमध्ये कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करणार नाही याची त्यांनी आंतरराष्ट्रीय हमी द्यायला पाहिजे. य.वेळी आमच्याकडून प्रत्युत्तर वेगळे असणार आहे. डोळ्यांचा बदला डोळा नव्हे तर डोक्याच्या बदल्यात डोके असेल त्यांनी म्हटले.

पुढे त्यांनी म्हटले की, शत्रूंना आखाती देशही सोडण्यास भाग पाडू. अमेरिका आणि इस्त्रायलने केलेल्या हल्ल्यात इराणचे सर्वाेच्च नेते ठार झाले. त्यांनंतर इराण पेटून उठला. आता युद्धात अमेरिका कुठे ना कुठे एक पाऊल मागे घेताना दिसत आहे. पण इराण हे होऊ देत नाही. अमेरिकेवर इराणकडून अनेक प्रकारेच निर्बध लादण्यात आले.

आता तेच आर्थिक निर्बंध उठवण्याची मागणी इराणकडून केली जात आहे. रेझाई यांनी यादरम्यान बोलताना म्हटले की, अमेरिका तयार असल्यामुळे हे युद्ध आठवडाभरापूर्वीच संपू शकले असते, परंतु बेंजामिन नेतान्याहू यांनी त्यांच्यावर लढाई सुरू ठेवण्यासाठी दबाव टाकला. मला स्पष्टपणे वाटते की, या युद्धात विजयाचा कोणताही स्पष्ट मार्ग नाही, आता हे अमेरिकेला समजल्याचे दिसत आहे.

Follow Us