युद्धादरम्यान इराणला मोठा धक्का, ‘या’ महत्वाच्या देशाने साथ सोडली

इस्रायल आणि इराणमध्ये युद्ध सुरु आहे. बहुतांशी इस्लामिक देश इराणच्या बाजूने आहेत. मात्र एका इस्लामिक देशाने इराणला मोठा धक्का दिला आहे.

युद्धादरम्यान इराणला मोठा धक्का, या महत्वाच्या देशाने साथ सोडली
Iran War Update
| Updated on: Jun 17, 2025 | 9:02 PM

इस्रायल आणि इराणमध्ये युद्ध सुरु आहे. दोन्ही देश एकमेकांवर हल्ले करत आहे. जगभरातील देश या युद्धाबाबत आपापली भूमिका जाहीर करत आहेत. बहुतांशी इस्लामिक देश इराणच्या बाजूने आहेत. तसेच काही देश हे इस्रायलच्या बाजूने आहेत. मात्र आता एका इस्लामिक देशाने इराणला मोठा धक्का दिला आहे. हा देश कोणता आहे ते जाणून घेऊयात.

पाकिस्तानचा मित्र म्हणून ओळख असणाऱ्या अझरबैजानने इराणला दणका दिला आहे. आज (17 जून) 21 मुस्लिम देशांनी इस्रायलविरुद्ध सामूहिक निषेध व्यक्त केला आहे. या 21 देशांमध्ये पाकिस्तान आणि तुर्कीचे नाव आहे, परंतु अझरबैजान या देशाने इराणला पाठिंबा देण्यास नकार दिला आहे.

इराणच्या मेहर न्यूज एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार इराणला पाठिंबा दिलेल्या देशांमध्ये इराक, लिबिया, बहरीन, जॉर्डन, कुवेत, कतार, सौदी, जिबूती, चाड, संयुक्त अरब अमिराती या देशांचा समावेश आहे.तुर्कीनेही इराणला पाठिंबा दिला आहे, मात्र ते इराणला अणुशक्ती बनू देऊ इच्छित नाहीत.

अझरबैजानने इराणच्या मुद्द्यापासून स्वतःला का दूर ठेवले?

समोर आलेल्या माहितीनुसार अझरबैजानचे इस्रायलशी व्यापारी संबंध आहेत. तसेच अझरबैजानने गेल्या वर्षी इस्रायलला दहा लाख टन तेल विकले आहे, यावेळीही ते तेल विकणार आहेत. इराणही तेलाचा व्यापार करतो, जर अझरबैजानने इराणला पाठिंबा दिला असता तर इस्रायलची अडचण आणखी वाढली असती.

आणखी एक कारण म्हणडे अझरबैजानचा शत्रू असलेल्या अर्मेनियाने इराणला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे अझरबैजानने इराणला पाठिंबा दिला नसावा. तसेच अझरबैजान स्वतः युद्धात अडकलेला देश आहे. दुसऱ्याच्या युद्धात अडकून ते स्वतःच्या अडचणी वाढवू इच्छित नाही म्हणूनही या देशाने इराणला पाठिंबा दिलेला नाही.

57 पैकी फक्त 21 देशांचा पाठिंबा

मुस्लिम संघटना ओआयसीमध्ये एकूण 57 देश आहेत, मात्र त्यातील फक्त 21 देशांनी इराणला समर्थन दिले आहे. 36 देश अजूनही शांत आहेत. तसेच ज्या मोठ्या मुस्लिम देशांमध्ये पाठिंबा दिला नाही त्यात बांगलादेश आणि सीरिया यांचाही समावेश आहे. कारण बांगलादेश आणि सीरिया देशांनीही इराणच्या बाजूने सामूहिक निवेदन दिलेले नाही.