Iran Israel War Update : इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धात आता अमेरिकेने उडी घेतली आहे. अमेरिकेने इराणच्या तीन आण्विक केंद्रांवर एअर स्ट्राईक केलं आहे. त्यामुळे आता संपूर्ण जगावरच युद्धाचे काळे ढक जमा झाल्याचं बोललं जातंय. आता इराण या हल्ल्यांना जशास तसं उत्तर देण्याची शक्यता आहे. दरम्यान, अमेरिकेने अगोदर इराणला चर्चेसाठी सहमती दाखवण्यास 2 आठवड्यांचा वेळ दिला होता. मात्र लगेच दोन दिवसांत एअर स्ट्राईक केलं. त्यानंतर आता अमेरिकेने असा निर्णय का घेतला? अस सवा केला जात आहे.
दोन आठवड्यांचा वेळही दिला होता, पण…
अमेरिकेने अगोदर इराणला इस्रायलससोबत चर्चा करायला तयारी दाखवा, असे सांगितले होते. त्यासाठी अमेरिकेने इराणला दोन आठवड्यांचा वेळही दिला होता. दुररीकडे इराण हा थेट अमेरिकेऐवजी युरोपियन संघाशी चर्चा करत होता. मात्र दोन आठवडे देण्याऐवजी लगेच दोन दिवसांच्या आत अमेरिकेने इराणवर हल्ला केला. एक्सियोसने दिलेल्या वृत्तानुसार थेट सैन्य कारवाई करण्याआधी इराण आणि अमेरिका यांच्या अधिकाऱ्यांत चर्चा व्हावी या पर्यायावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प विचार करत होते. तुर्कीचे राष्ट्रपती एर्दोगान यांनी जी-7 बैठकीदरम्यान तसा प्रस्ताव ट्रम्प यांच्यापुढे ठेवला होता.
