Iran- Israel War : इराणला सर्वात जवळच्या मित्राचा मोठा धक्का; चीनची नवी खेळी

इराण आणि इस्रायलमध्ये भीषण युद्ध सुरू आहे, यामुळे मध्यपूर्वेमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. इराणला चीनकडून मदतीची अपेक्षा आहे, मात्र सध्यातरी इराणचा अपेक्षाभंग झाल्याचं पाहायला मिळत आहे.

Iran- Israel War : इराणला सर्वात जवळच्या मित्राचा मोठा धक्का; चीनची नवी खेळी
| Updated on: Jun 23, 2025 | 7:35 PM

इराण आणि इस्रायलमध्ये भीषण युद्ध सुरू आहे, यामुळे मध्यपूर्वेमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. अमेरिकेनं इराणवर हल्ला केल्यानंतर तर आता हे युद्ध आणखी भडकणार असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. दरम्यान अमेरिकेनं इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर इराणला चीन आणि रशियाकडून मदतीची अपेक्षा आहे, त्यापैकी रशियानं तर इराणला उघड पाठिंबा दिला आहे. मात्र दुसरीकडे चीनने दुटप्पी भूमिका घेतल्याचं दिसून येत आहे.

अमेरिकेनं इराणवर केलेल्या हल्ल्याचा चीनने निषेध केला आहे, मात्र अजूनही चीनने आपला मित्र असलेल्या इराणला उघड पाठिंबा दिलेला नाहीये. अमेरिकेनं इराणवर केलेल्या हल्ल्याचा निषेध करताना चीनने म्हटलं आहे की, अमेरिकेनं इराणवर हल्ला करून आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन केलं आहे, आम्ही याचा निषेध करतो. आम्ही हा मुद्दा सयुक्त राष्ट्रामध्ये उपस्थित करू, मात्र तज्ज्ञांच्या मते चीन सध्या तरी फक्त इराणसोबत असल्याचं दाखवत आहे, मात्र कोणतीही ठोस भूमिका घेण्याचं चीनने टाळलं आहे.

चीन इराणकडून मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाची आयात करतो, चीन आणि इराणमध्ये मोठ्या प्रमाणात व्यापारी आणि आर्थिक संबंध आहेत. त्यामुळे चीनने या हल्ल्याचा निषेध केला आहे. चीनला उघडपणे इराणलाही नाराज करायचं नाहीये, तर दुसरीकडे अमेरिकेसोबत देखील संबंध आणखी खराब करायचे नाहीयेत, असं तज्ज्ञाचं म्हणणं आहे.

दरम्यान दुसरीकडे मात्र रशियानं इराणला उघडपणे पाठिंबा दिला आहे. आमचा इराणला पाठिंबा आहे, आम्ही मध्यस्थीसाठी देखील प्रयत्न करण्यास तयार आहोत. इराणला आमच्याकडून काय मदत पाहिजे हे आता त्यांच्या भूमिकेवर अवलंबू आहे, आम्ही इराणला सर्व प्रकारची मदत करण्यास तयार आहोत असं रशियानं म्हटलं आहे. जर आमचे सैन्य इराणच्या मदतीसाठी या युद्धात उतरले तर युद्धाचं स्वरुप फार स्फोटक असेल असा इशाराही रशियाकडून देण्यात आला आहे. दरम्यान रशियानं घेतलेल्या या भूमिकेमुळे आता इराणची शक्ती वाढली आहे, तर दुसरीकडे मात्र अमेरिका आणि इस्त्रायलचं टेन्शन वाढलं आहे.