मोठी बातमी! रशियानं वाढवली जगाची चिंता; इराण, इस्त्रायल युद्ध सुरू असतानाच मोठा दावा

इराण आणि इस्त्रायलमध्ये भीषण युद्ध सुरू आहे, हे युद्ध सुरू असतानाच आता रशियाकडून मोठा दावा करण्यात आला आहे, या दाव्यामुळे जगाची चिंता वाढली आहे.

मोठी बातमी! रशियानं वाढवली जगाची चिंता; इराण, इस्त्रायल युद्ध सुरू असतानाच मोठा दावा
Image Credit source: TV9 Hindi
| Updated on: Jun 22, 2025 | 5:59 PM

इराण आणि इस्रायलमध्ये सध्या भीषण युद्ध सुरू आहे, या युद्धामुळे मध्यपूर्वेमधील तणाव चांगलाच वाढला आहे. त्यातच आता अमेरिकेनं इराणवर एअरस्ट्राईक केल्यामुळे वातावरण आणखी पेटण्याची शक्यता आहे. अमेरिकेनं इराणवर केलेल्या एअर स्ट्राईकनंतर रशियाकडून मोठं वक्तव्य करण्यात आलं आहे. रशियाचे माजी राष्ट्रपती आणि सुरक्षा परिषदेचे उपाध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांनी मोठा दावा केला आहे. अनेक देश इराणला आपले अण्वस्त्र देण्यास तयार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. अमेरिकेनं इराणवर हल्ला केल्यानंतर लगेचच रशियाकडून हे वक्तव्य करण्यात आलं आहे.

अमेरिकेन इराणच्या तीन अणू तळांवर फोर्डो, नतांज आणि इस्फहानवर एअरस्ट्राईक केला. या एअर स्ट्राईकवर प्रतिक्रिया देताना दिमित्री मेदवेदेव यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. अनेक देश इराणला आपले अण्वस्त्र देण्यास तयार आहेत, त्यामुळे इराणचा अणू कार्यक्रम थांबवण्याचा हा अमेरिकेचा अयशस्वी प्रयत्न होता, मात्र यामुळे आता मध्यपूर्वेमधील तणाव वाढला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

मेदवेदेव यांनी केलेल्या या धक्कादायक दाव्यामुळे चिंता वाढली आहे, अनेक देश इराणला अण्वस्त्रे देण्यास तयार आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे. मात्र ते कोणते देश आहेत? याबद्दल त्यांनी माहिती दिलेली नाहीये. रशियाकडून करण्यात आलेला हा दावा (NPT) अण्वस्त्र प्रसारबंदी करारासाठी धोका मानला जात आहे.

दरम्यान इराणचे इस्त्रायलवर हल्ले सुरूच आहेत. इराणने इस्त्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला केला, या हल्ल्यामध्ये इस्त्रायलच्या बेन गुरियन विमानतळ आणि लष्करी तळांना लक्ष्य करण्यात आलं. या हल्ल्यामुळे इस्त्रायलयचं मोठं नुकसान झालं असून, सामान्य नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे. तेल अवीव आणि हैफा सारख्या मोठ्या शहरांमध्ये जोरदार स्फोट झाले आहेत. शाळांना सुट्टी देण्यात आली असून, नागरिक बंकरखाली लपले आहेत.