जगात हाहाकार, इराण-अमेरिकचं युद्ध आता दुबईच्या वेशीवर, धोका वाढला; ड्रोन हल्ल्यांनी हादरलं एअरपोर्ट

इराण-अमेरिकेच्या युद्धामुळे मध्यपूर्वेत तणाव वाढला असून, दुबईलाही या संघर्षाची झळ बसली आहे. अलीकडे दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ झालेल्या ड्रोन हल्ल्याने मोठे नुकसान झाले, ज्यामुळे उड्डाणे तात्पुरती स्थगित करावी लागली. सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हा हल्ला मध्यपूर्वेतील युद्ध दुबईच्या वेशीपर्यंत पोहोचल्याचे दर्शवतो, ज्यामुळे प्रदेशातील सुरक्षा चिंता वाढल्या आहेत.

जगात हाहाकार, इराण-अमेरिकचं युद्ध आता दुबईच्या वेशीवर, धोका वाढला; ड्रोन हल्ल्यांनी हादरलं एअरपोर्ट
दुबई इंटरन2शनल एअरपोर्ट
| Updated on: Mar 16, 2026 | 8:29 AM

इराण वि इस्रायल-अमेरिकेच्या युद्धामुळे जगात हाहा:कार माजला असून परिस्थिती झपाट्याने बिघडत आहे. या संघर्षात फक्त तीन देशच होरपळत नाहीयेत, तर आजूबाजूच्या , शेजारील काही देशांवरही हल्ले होत आहेत. युद्ध सुरू झाल्यापासून दुबईवर देखील अनेक वेळा हल्ले झाले आहेत. आता पुन्हा एकदा दुबईला टार्गेट करण्यात आलं असून सोमवारी सकाळी थेट दुबई एअरपोर्टजवळच ड्रोन कोसळून मोठा हल्ला झाला. त्यावेळी मोठा स्फोटही झाला असून त्याच स्फोटामुळे तिथे असलेल्या इंधनाच्या टाकीला आग लागली. मात्र अथक प्रयत्नांनी ही आग आटोक्यात आणून विझवण्यात आली. पण या स्फोटानंतर सुरक्षेच्या कारणास्तव, दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्व उड्डाणे स्थगित करण्यात आली आहेत. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही अथवा जीवितहानी झाली नाही. मात्र यामुळे इराण-अमेरिकचं युद्ध आता दुबईच्या वेशीपर्यंत येऊन पोहोचलं असून धोका आणखनीच वाढला आहे.

स्थानिक लोकांच्या सांगण्यानुसार, रात्रीच्या शांततेत अचानक धमाक्यांचे, स्फोटाचे आवाज ऐकू आले. त्यानंतर काही वेळातच विमानतळाजवळ धूर आणि आगीच्या ज्वाळा उठताना दिसल्या. दुबई सिव्हिल डिफेन्स आणि इतर आपत्कालीन प्रतिसाद पथकांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेत आग विझवण्यास सुरुवात केली. दुबई मीडिया ऑफिसने X वर दिलेल्या माहितीनुसार, अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करत आग विझवली. या हल्ल्यात कोणतीही दुखापत झाली नाही. भरपूर नुकसान लक्षणीय झाले, जीवितहानी कमी झाल्यामुळे अधिकाऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र या ड्रोन हल्ल्यांमुळे दुबईतील नागरिक खूप दहशतीत आहेत.

 

उड्डाणं स्थगित

या हल्ल्यानंतर दुबई नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने प्रवाशांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील उड्डाणे तात्पुरती स्थगित करण्याची घोषणा केली आहे. विमानतळावर कोणीही विमानतळाजवळ येऊ नये असे स्पष्ट निर्देशही देण्यात आले आहेत. तेसच विमानतळ अधिकाऱ्यांनी जनतेला उड्डाणाचे सर्व अपडेट्स ऑनलाइन तपासण्याचे आवाहन केले आहे. या काळात विमानतळाशी संपर्क टाळा, जवळपास येऊ नका अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

विमानतळाभोवती ड्रोनचा धोका वाढल्याच्या अहवालांमुळे सुरक्षा संस्थांच्या चिंतेत वाढ झाली आहे. यापूर्वीही अनेकदा विमानतळं टार्गेट करण्यात आली होती, ज्यामुळे असंख्य लोक जखमी झाले आहेत. म्हणूनच अधिकाऱ्यांनी यावेळी संपूर्ण विमानतळ परिसर बंद केला आहे.

एका आठवड्यात दुसरा हल्ला

याच आठवड्यात हा दुसरा हल्ला होता. या हल्ल्याच्या पाच दिवस आधी देखील इराणने ड्रोन हल्ला केला होता, ज्यामध्ये एका भारतीयासह चार जण जखमी झाले होते. दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या या युद्धाने मध्यपूर्वेतील देशांना उद्ध्वस्त केले आहे. इराणने यापूर्वी दुबई विमानतळाजवळ तसेच शहरातील निवासी भागात हल्ले केले आहेत.

Follow Us