इराणची जगाला झोप उडवणारी धमकी, थेट हिंद महासागराकडे मोर्चा, अमेरिका..
इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव काही कमी होत नाही. त्यातच आता इराणकडून अत्यंत मोठी धमकी देण्यात आली. अमेरिकेने ज्याचा साधा विचारही केला नाही, अशी धमकी इराणकडून देण्यात आली.

इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध पुन्हा एकदा पेटताना दिसत आहे. त्यातच अमेरिकेने इराणला धमकी दिली. पूर्ण देश संपून टाकण्याची भाषा अमेरिकेकडून केली जात आहे. अमेरिकेच्या धमकीला तसेच उत्तर इराणकडून दिले जात आहे. मात्र, या दोन्ही देशातील संघर्षाने जगाचे टेन्शन वाढले. इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव काही थांबण्याचे नाव घेत नाही. यादरम्यानच इराणने इशारा देत म्हटले आहे की, त्यांनी त्यांच्या नौदलाच्या पातळीवर संघर्ष करण्याची क्षमता विकसित केली. अमेरिकेने इराणवर मोठे हल्ले केले, पण इराणने हार मानली नाही. इराणने म्हटले की, जर पुन्हा युद्धाची स्थिती निर्माण झाली तर हिंद महासागरातील अमेरिकन जहाजांना टार्गेट करून हल्ले करू. इराणची ही आतापर्यंतची अत्यंत मोठी धमकी आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊसच्या बाहेर होते. मात्र, आपली सुट्टी सोडून अचानक डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये परतले. मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. निर्णायक स्थितीत युद्ध पोहोचल्याचे सांगितले जात आहे. संपूर्ण देश एका झटक्यात उडवून देण्याची भाषा होत आहे. पुढील काही तासात काहीही घडू शकते. अमेरिकेला युद्धविरामचा प्रस्ताव इराणने दिला.
कतारच्या माध्यमातून त्यांनी हा प्रस्ताव दिला. हैद्राबादमधील इराणी दूतावासाच्या पोस्टनुसार, इराणच्या सुरक्षा परिषदेचे सचिव मोहसेन रेझाई यांनी म्हटले की, जर आता युद्ध पुन्हा भडकले तर आम्ही हिंद महासागरातील अमेरिकन जहाजांना टार्गेट करून हल्ले करू. जिथे कुठे हे जहाजे असतील तिथे हे हल्ले केले जातील.
आम्ही तशी क्षमता विकसित केली आहे. हा अमेरिकेला मोठा झटका म्हणावा लागेल. यापूर्वी इराणकडून अशाप्रकारची धमकी देण्यात आली नव्हती. त्यांनी मागील काही दिवसांच्या संघर्षानंतर ही क्षमता विकसित केली. हिंद महासागरात यामुळे अस्थिरता निर्माण होऊ शकते. इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव वाढल्याने पुन्हा जागतिक बाजार संकटात आहे, कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. भारतासह अन्य देश या युद्धामुळे संकटात आहेत.