
इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध टोकाला पोहोचले असून आज युद्धाला आठ दिवस पूर्ण झाली. मात्र, अजूनही स्थिती तणावात आहे. पुढील काही दिवस युद्ध चालण्याचे संकेत असतानाच जगातील अनेक देश संकटात आहेत. युद्धामुळे गॅस आणि तेल टंचाई निर्माण झाली. इराणवर मोठे हल्ले केले जात आहेत. इराणकडूनही आतापर्यंत साैदी अरेबिया, दुबई, कतार, कुवेतमधील अमेरिकेन लष्कर तळांना टार्गेट करत मोठे हल्ले करण्यात आले. अमेरिका जरी इराणवर मोठे हल्ले करत आहे, ही वस्तूस्थिती असली तरीही इराण देखील अमेरिकेला सळो की पळो करून सोडताना दिसत आहे. अमेरिकेच्या लष्कर तळांचे मोठे नुकसान इराणने केले आहे. यादरम्यानच इराणसोबतच्या युद्धात अमेरिकेने मोठा दावा केला. 7 दिवसांत 3000 हून अधिक लक्ष्य उद्ध्वस्त केल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. इराणच्या प्रमुख शहरांचे मोठे नुकसान झाले.
इराण कोणत्याही स्थितीमध्ये हार मानता दिसत नाही. आता नुकताच इराणकडून अत्यंत मोठा हल्ला सौदी अरेबियाच्या हवाई तळावर करण्यात आला. इराणने सौदी अरेबियातील प्रिन्स सुलतान हवाई तळावर हल्ला केला आहे. यातील धक्कादायक बाब म्हणजे या हवाई तळावर अमेरिकन सैन्य तैनात होते. थेट अमेरिकेच्या सैन्याला टार्गेट करत हा हल्ला इराणकडून करण्यात आला.
या हल्ल्यात हवाई तळावरील अनेक लोक गंभीर जखमी झाल्याचीही माहिती आहे. हा अमेरिकेला अत्यंत मोठा घात असल्याचे बोलले जाते. अमेरिकेच्या अनेक लष्कर तळावर इराणकडून हल्ला करण्यात आला. मात्र, ज्या ठिकाणी अमेरिकेचे जास्त सैनिक उपस्थित होते आणि तो हवाई तळ साैदी अरेबियाचे असतानाही हा मोठा हल्ला इराणकडून करण्यात आला.
अमोरिकेचे हवाई तळ, अमेरिकेचे दूतावास कार्यालय आणि आता थेट अमेरिकेचे सैनिक इराणच्या निशाण्यावर असल्याची माहिती मिळत आहे. आता यावर अमेरिका नक्की काय भूमिका घेते हे देखील पाहण्यासारखे ठरणार आहे. मात्र, इराणकडून करण्यात आलेल्या या हल्ल्यामुळे मोठी खळबळ उडाली. यासोबतच इराणकडून अमेरिकेला खुली धमकी देखील दिली जात आहे.