इराणकडून अमेरिकेला मोठा दणका!, बदला घेतलाच, थेट अमेरिकेच्या विमानांवरच…

इस्त्रायल आणि इराण यांनाच युद्धाचा फटका बसत नसून जगातील अनेक देशांना या युद्धाचा मोठा फटका बसला आहे. आखाती देशाचे मोठे नुकसान झाले. जागतिक बाजारात तेलाच्या किंमती गगणाला पोहोचल्या आहेत. यादरम्यानच इराणकडून मोठा हल्ला करण्यात आला.

इराणकडून अमेरिकेला मोठा दणका!, बदला घेतलाच, थेट अमेरिकेच्या विमानांवरच...
US fighter jets
| Updated on: Mar 14, 2026 | 9:01 AM

इराण आणि अमेरिका युद्ध थांबावे, अशी इच्छा जगातील जवळपास सर्वच देशांची आहे. कारण या युद्धाचा फटका सर्वांनाच बसताना दिसत आहे. युद्ध जर अजून काही काळ चालले तर मोठा विनाश होऊ शकतो. युद्धाला आज 15 दिवस पूर्ण झालेली असताना कच्च्या तेलाची निर्यात कमी झाली असून भारतासह अनेक देशात गॅसचे संकट आहे. रशियाच्या तेलावर अनेक मोठे निर्बंध घालण्यात आले. मात्र, या काळात अमेरिकेला रशियाची आठवण झाली असून जागतिक बाजारपेठेत तेलाच्या किंमती स्थिर ठेवण्याकरिता अमेरिकेने थेट रशियाच्या तेलावरील निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला. सध्या जागतिक बाजारात तेलाच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. इराणकडून थेट सांगण्यात आले की, तेलाच्या किंमती अमेरिका नाही तर इराण ठरवेल. इराणकडून होर्मुज हा मार्ग बंद करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आणि कच्च्या तेलाचे भाव सातत्याने वाढत आहेत.

अमेरिका आणि इराण युद्ध थांबवण्याचे नाव घेत नाही. अमेरिकेकडून इराणच्या महत्वाच्या बेटावर मोठा हल्ला करून तेथील पायाभूत सुविधा नष्ट करण्यात आल्या. इराणकडूनही अमेरिकेला थेटपणे धक्का देण्यासाठी मोठा हल्ला करण्यात आला. या हल्ल्याचा अमेरिकेने स्वप्नातही विचार केला नसावा, असा थेट हल्ला इराणकडून करण्यात आला.

सौदी अरेबियातील प्रिन्स सुलतान हवाई तळावर पुन्हा एकदा इराणकडून हल्ला करण्यात आला. मोठ्या क्षेपणास्त्रांनी हा हल्ला करण्यात आला. इराणी क्षेपणास्त्र हल्ल्यात अमेरिकेच्या हवाई दलाच्या पाच इंधन भरणाऱ्या विमानांचे नुकसान झाल्याचीही माहिती मिळत आहे. अमेरिकेच्या हवाई दलाच्या लढाऊ विमानात इंधर भरले जात होते, त्यावेळीच हा हल्ला करण्यात आला.

या हल्ल्यानंतर मोठी खळबळ उडाली. या हल्ल्यात अमेरिकेच्या लष्कारातील विमानांचे मोठे नुकसान झाल्याचीही माहिती मिळत आहे. अमेरिकेच्या विमानांना इराणकडून टार्गेट केले जात असल्याचे बघायला मिळत आहे. इराण आणि संघर्ष वाढला आहे. इस्त्रायलकडूनही मोठे हल्ले इराणवर केले जात आहेत. मात्र, इराणसोबतच्या युद्धात आखाती देश अमेरिकेवर नाराज आहेत.

Follow Us