AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराणचे सर्वाेच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबद्दल अमेरिकेची सर्वात मोठी घोषणा, थेट 1 कोटी…

अमेरिका आणि इराण यांच्यात युद्ध सुरू असून आज युद्धाचा 15 वा दिवस आहे. इराण कोणत्याही परिस्थितीमध्ये हार मानत नसल्याने अमेरिकेचा थयथयाट झाला. यासोबतच हे युद्ध थांबवण्याकरिता अमेरिकेवर मोठा दबाव आहे. अनेक देशांमध्ये आणीबाणी लागू होण्याची स्थिती आहे.

इराणचे सर्वाेच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबद्दल अमेरिकेची सर्वात मोठी घोषणा, थेट 1 कोटी...
Mojtaba Khamenei
| Updated on: Mar 14, 2026 | 8:33 AM
Share

अमेरिका आणि इराण युद्ध पेटले आहे. आज युद्धाचा 15 वा दिवस आहे. मोठे हल्ले केले जात आहेत. इराणने होर्मुज सागरीमार्ग बंद केल्याने अमेरिका आणि इस्त्रायलवरील दबाव वाढला. निर्यात आणि आयात थांबली. इराणचे सर्वाेच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांना अमेरिकेने हल्ल्यात ठार केले. फक्त आयातुल्ला अली खामेनेई हेच नाही तर त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील अनेक जण ठार झाले. आयातुल्ला अली खामेनेई यांच्या निधनानंतर इराणमध्ये एक मोठी संतापाची लाट बघायला मिळाली. इराण अधिक घातक बनला आणि ज्या कोणत्या आखातील देशामध्ये अमेरिकेचे लष्कर तळ आहेत, अशा ठिकाणी हल्ला करण्यास सुरूवात केली. या युद्धाचा फटका आपल्याला बसणार नाही, असे कुवेत, कतार आणि साैदी अरेबियाला वाटत होते. मात्र, सर्वात जास्त या युद्धाचा फटका त्यांनाच बसला आहे. नेहमी पर्यटकांची वर्दळ असलेल्या दुबईत आज रस्त्यावर लोक नाहीत. यादरम्यानच आता अमेरिकेकडून अत्यंत मोठी घोषणा करण्यात आली.

आयातुल्ला अली खामेनेई यांच्या निधनानंतर इराणचे सर्वाेच्च नेते म्हणून आयातुल्ला अली खामेनेई यांचा मुलगा मोजतबा खामेनेई याच्या नावाची घोषणा करण्यात आली. जशीही मोजतबा खामेनेई यांच्या नावाची घोषणा करण्यात आली, तसा इराण अधिक घातक बनला आणि थेट इस्त्रायलवर मोठे क्षेपणास्त्र टाकली. मात्र, मोजतबा खामेनेई जास्त काळ जिवंत राहणार नसल्याचे थेट धमकीच अमेरिकेने दिली.

या युद्धात अमेरिकेच्या निशाण्यावर इराणचा सर्वाेच्च नेता असल्याचे अगोदरच स्पष्ट आहे. आयातुल्ला अली खामेनेई यांच्यावर करण्यात आलेल्या हल्ल्यात मोजतबा खामेनेई जखमी झाल्याचे सांगितले जाते. त्यांच्या पायाला दुखापत झाली. मात्र, यानंतर मोजतबा खामेनेई यांनी इराणच्या जनतेला संबोधित केले आणि इराण हे युद्ध सुरू ठेवणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. मात्र, मोजतबा खामेनेई अजूनही कॅमेऱ्यापुढे आले नाहीत, त्यांच्या तब्येतीबद्दल विविध चर्चा रंगताना दिसत आहेत.

आता नुकताच अमेरिकेने अत्यंत मोठी घोषणा केली असून थेट मोजतबा खामेनेई यांच्यावर 1 कोटींचे बक्षिस जाहीर केले. मोजतबा खामेनेई यांच्याबद्दल काहीही माहिती देणाऱ्या आणि यासोबतच्या इराणच्या अजून 10 नेत्यांबद्दल माहिती देणाऱ्या अमेरिका 1 कोटी रूपये देणार आहे. अमेरिकेकडून 1 कोटींचे बक्षिस दिले जाणार आहे. अमेरिकेच्या या घोषणेनंतर मोठी खळबळ उडाल्याचे बघायला मिळत आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल