
अमेरिका आणि इस्त्रायलने 28 फेब्रुवारी 2026 रोजी मोठा हल्ला इराणवर केला. या हल्ल्यात इराणचे सर्वाेच्च नेते ठार झाले. इराणने थेट आखाती देशांमध्ये असलेल्या अमेरिकेच्या लष्कर तळावर हल्ले केले. आज या युद्धाला 18 दिवस पूर्ण झाली. मात्र, युद्ध काही थांबण्याचे नाव घेत नाहीये. अनेक देश युद्ध थांबवण्याची मागणी करत आहेत. मात्र, कुठेतरी अमेरिका या युद्धात मागे पडल्याचे बघायला मिळत आहे. होर्मुज खाडी सुरक्षित करण्याकरिता डोनाल्ड ट्रम्प यांनी काही देशांकडे मदत मागितली. मात्र, एकही देश मदतीकरिता पुढे आला नाही. थेट सर्वांनी या युद्धापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला.डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून युद्धात उतरण्याकरिता चीनवर दबाव टाकला जात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणसोबत युद्ध करण्याचा निर्णय चुकल्याचे सांगितले जात आहे. इस्त्रायल आणि अमेरिका मिळून इराणवर मोठे हल्ले करत आहेत. तरीही एकही पाऊस मागे हटताना इराण दिसत नाहीये.
अमेरिकेकडून इराणच्या प्रमुख ऊर्जा प्रकल्पाला टार्गेट करत हल्ला करण्यात आला. ज्यानंतर इराणकडून थेट अमेरिकेशी संबंध कंपन्यांना उडवून देण्याची धमकी दिली. होर्मुज खाडी सुरू करण्याकरित अमेरिकेकडून प्रयत्न केली जात आहेत. इराणने होर्मुज खाडी बंद केल्याने अमेरिका संकटात आहे. यासोबतच जागतिक बाजारात तेलाचा किमतीमध्ये मोठी वाढ होत आहे. अमेरिका आणि इराण युद्धामुळे जागतिक बाजार अस्थिर झाला.
अमेरिकेवर यादरम्यान मोठा दबाव वाढल्याचे बघायला मिळत आहे. होर्मुज खाडीच्या मुद्द्यातून डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक धमक्या इराणला दिल्या आहेत. मात्र, तरीही इराण मागे हटताना दिसत नाही. इराणची लष्करी ताकद संपली असून होर्मुज खाडीत इराण काहीच करू शकत नाही, असाही दावा डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून करण्यात आला. आता डोनाल्ड ट्रम्प यांना अत्यंत मोठा धक्का बसला आहे.
इराणकडून थेट होर्मुज खाडीत अमेरिकेच्या तेलवाहू जहाजाला मोठी आग लावण्यात आली. हा अमेरिकेला इराणकडून देण्यात आलेल्या थेट धक्काच म्हणावा लागेल. इतर देशांना होर्मुज खाडी सुरक्षित आहे म्हणणाऱ्या अमेरिकेचेच जहाज इराणकडून पेटून देण्यात आले. इराणसोबतच्या युद्धात अमेरिकेची मोठी नाचक्की झाल्याचे दिसत आहे. युद्धनाैका होर्मुजमध्ये आणूनच दाखवा, असाही इशारा इराणकडून अमेरिकेला देण्यात आला.