Video: मॉलमध्ये आरडाओरड, आकाशात स्फोट! कतारमध्ये इराणी हल्ल्यामुळे हाहाकार, अंगावर काटा आणणार व्हिडीओ

Iran Israel War: इराणने कतारमधील अमेरिकेच्या अल उदेद एअरबेसवर क्षेपणास्त्र हल्ला केला, ज्यामुळे दोहामध्ये दहशत निर्माण झाली आहे. तेथील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Video: मॉलमध्ये आरडाओरड, आकाशात स्फोट! कतारमध्ये इराणी हल्ल्यामुळे हाहाकार, अंगावर काटा आणणार व्हिडीओ
Doha Mall Attack
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Jun 24, 2025 | 11:35 AM

कतारची राजधानी दोहामध्ये सोमवारी रात्री इराणने हल्ला केला. इराणने तेथील अमेरिकन लष्करी तळ अल उदैद एअर बेसवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी लक्ष्य केले. त्यानंतर प्रचंड गोंधळ उडाला. हल्ल्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला, ज्यामध्ये दोहाच्या प्रसिद्ध व्हिलाजियो मॉलमध्ये स्फोटांचा आवाज ऐकू येताच लोक भयभीत होऊन इकडेतिकडे पळताना दिसले. पुरुष, स्त्रिया आणि मुले सर्वच घाबरून मॉलच्या बाहेर पळाले.

अमेरिकेच्या अण्वस्त्र तळांवरील हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणची कारवाई

इराणने हा क्षेपणास्त्र हल्ला अमेरिकेने त्याच्या अण्वस्त्र संकुलांवर नुकत्याच केलेल्या हल्ल्यांच्या प्रत्युत्तरात केला. इराणी सरकारने याला “निर्णायक प्रत्युत्तर कारवाई” असे म्हटले आहे. इराणी सरकारी दूरचित्रवाणीनेही या हल्ल्याची पुष्टी करत सांगितले की, लक्ष्य कतारमध्ये तैनात असलेले अमेरिकन सैन्य होते. या पावलाने खाडी क्षेत्रातील अमेरिका-इराण तणाव आणखी गडद झाला आहे.

वाचा: इस्त्रायलने टेकले गुडघे? इराणकडे युद्ध थांबवण्यासाठी केली मागणी, काय मिळाले उत्तर?

कतारची सतर्कता, क्षेपणास्त्र रोखले, कोणतीही जीवितहानी नाही

कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, इराणने एकूण १९ क्षेपणास्त्रे डागली. त्यापैकी एक क्षेपणास्त्र अमेरिकन तळावर आदळले, पण वेळीच क्षेपणास्त्रे रोखण्यात आल्याने मोठे नुकसान किंवा जीवितहानी टळली. तरीही दोहामध्ये नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण कायम आहे.

विमान उड्डाणांवर तात्पुरती बंदी, नंतर पुन्हा सुरू

हल्ल्यानंतर सार्वजनिक सुरक्षेचा विचार करून कतारमध्ये सर्व विमान उड्डाणांवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे काही काळ हवाई वाहतूक प्रभावित झाली आहे. नंतर परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर उड्डाणे पुन्हा सुरू करण्यात येणार आहेत.

सोशल मीडियावर नागरिकांची चिंता

व्हिलाजियो मॉलचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जगभरातील लोकांनी कतारमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली. व्हिडीओमधील गोंधळ आणि लोकांचा भय दर्शवणारा माहोल देशाच्या राजधानीतील तणावपूर्ण वातावरण स्पष्ट करतो.

ट्रम्प यांची युद्धविरामाची घोषणा आणि इराणचा नकार

हल्ल्याच्या काही तासांतच अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा केली की, इराण आणि इस्रायल “पूर्ण युद्धविराम”वर सहमत झाले असून, पुढील २४ तासांत तो लागू होईल. पण इराणने ही घोषणा खोटी ठरवली आणि कोणत्याही कराराला स्पष्ट नकार दिला.