Iran-Pakistan : अरेरे, राष्ट्रपती रईसीना पाकिस्तानात अशी वागणूक, इराण-पाक मैत्रीची पोलखोल

Iran-Pakistan : पाकिस्तानात सार्वत्रिक निवडणूक झाल्यानंतर पाकिस्तानचा दौरा करणारे रईसी पहिले राष्ट्रपती आहेत. रईसी यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. विभिन्न क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी रईसी आणि शरीफ यांच्या उपस्थितीत इराण-पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.

Iran-Pakistan : अरेरे, राष्ट्रपती रईसीना पाकिस्तानात अशी वागणूक, इराण-पाक मैत्रीची पोलखोल
ebrahim raisi-sharif
Follow us
| Updated on: Apr 24, 2024 | 1:32 PM

इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी पाकिस्तान दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्यादरम्यान पाकिस्तान आणि इराण मैत्रीची एका झटक्यात पोलखोल झाली आहे. इराणच्या राष्ट्रपतींना लाहोरमध्ये लोकांना संबोधित करायचं होतं. पण पाकिस्तानने असं होऊ दिलं नाही. त्यांनी टाळाटाळ करुन तो प्रोग्राम कॅन्सल केला. इराणला जास्त भाव देण्याच्या नादात पाकिस्तानला सौदी अरेबिया आणि अमेरिकेला नाराज करायच नाहीय. त्याआधी सोमवारी इब्राहिम रईसी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची भेट झाली. दोघांनी राजकीय, आर्थिक, व्यापार आणि सांस्कृतीक पातळीवर द्विपक्षीय संबंध अधिक बळकट करण्यावर चर्चा केली. त्याशिवाय दोन्ही देशांमध्ये दहशतवाद संपवण्यासाठी संयुक्त प्रयत्न करण्यावर एकमत झालं.

काही महिन्यापूर्वी दोन्ही देशांनी परस्पराच्या देशात घुसून दहशतवादी ठिकाणांवर एअर स्ट्राइक केला होता. पाकिस्तानात सार्वत्रिक निवडणूक झाल्यानंतर पाकिस्तानचा दौरा करणारे रईसी पहिले राष्ट्रपती आहेत. रईसी यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. विभिन्न क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी रईसी आणि शरीफ यांच्या उपस्थितीत इराण-पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. इराण आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय व्यापार 10 अब्ज अमेरिकी डॉलरपर्यंत नेण्याचा संकल्प दोन्ही देशांनी केलाय.

पाकिस्तानचे पंतप्रधान शरीफ काय म्हणाले?

‘आम्ही सर्वोच्च पातळीवर संबंध मजबूत करण्यासाठी कटिबद्ध आहोत’ असं इराणचे राष्ट्रपती रईसी म्हणाले. पाकिस्तानचे पंतप्रधान शरीफ म्हणाले की, “संपूर्ण पाकिस्तान इराणच्या राष्ट्रपतीच स्वागत करतो. अनेक आव्हान असूनही इराण-पाकिस्तान संबंध मजबूत करण्याच त्यांनी आवाहन केलं”

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.